दहा वर्ष सत्तेत राहून 26 पक्षाचा आधार घ्यावा लागणे, हा मोदी सरकारचा पराभव; वडेट्टीवारांचा निशाणा

दहा वर्ष सत्तेत राहून 26 पक्षाचा आधार घ्यावा लागणे, हा मोदी सरकारचा पराभव; वडेट्टीवारांचा निशाणा

Vijay Vadettivar : ‘दहा वर्ष सत्तेत राहून 26 पक्षाचा आधार घ्यावा लागणे, हा मोदी सरकार पराभव आहे. तसेच महाराष्ट्रात पुन्हा महानाट्य होऊ नये, म्हणून 20 मंत्रिमंडळ विस्ताराच्या बावड्या उठवल्या जात आहेत.’ असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाल्यानंतर कॉंग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसेच त्यांनी राज्यातील शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीका केली. (Vijay Vadettivar Criticize Modi Government for taking support 26 parties )

Smriti Irani : जर गांधी कुटुंबात हिंमत असेल तर.. राहुल गांधींच्या भाषणानंतर स्मृती इराणींचा काँग्रेसवर घणाघात

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सुरूवातीला ज्येष्ठ सामाजिक लेखक आणि विचारवंत प्रा. हरी नरके (Hari Narke) यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहिली ते म्हणाले, हरी नरके ओबीसी विचाराचे मोठे पुरस्कर्ते होते. ओबीसीच्या जनगणनेसाठी आणि हक्कासाठी अनेक वर्ष लढवया म्हणून त्यांनी काम केले. आज आपल्यातून हरवल्याचं दुःख आहे. ती पोकळी कधी भरून निघणार नाही. ओबीसी जनतेला जागृत करण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं.

Don 3 First Look: ‘डॉन 3’ ची घोषणा करत व्हिडिओ रिलीज; रणवीर सिंगने घेतली …

पुढे वडेट्टीवार म्हणाले की, राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून आणि ओबीसी नेता म्हणून महाराष्ट्रातील अनेक आव्हानांना सामोर जायचं आहे. 14 कोटी लोकांचे हित जपत, 2024 च्या निवडणूक लढण्याची जिद्द परिवर्तन करण्याची जिद्द ठेवून, सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत जाणार आहे. मोठमोठ्या विकासाच्या कल्पना करणाऱ्या मोदी सरकारने मागील दहा वर्ष आरोपच करण्याचे काम केले आहे. किती वर्ष सत्ता टिकवण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप करणार, दहा वर्ष सत्तेत राहून जर तुम्हाला 26 पक्षाचा आधार घ्यावा लागत असेल तर यातच तुमचा पराभव आहे. जनतेच्या आश्वासनाचा तुम्हाला विसर पडला, त्यामुळे जनता तुम्हाला नाकारत आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या बावड्या उठवल्या जातात…

तसेच यावेळी वडेट्टीवार यांनी राज्यातील शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीका केली. ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा त्यांना लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत ठेवायची आहे. मोठा वर्ग त्यांच्यातील नाराज आहे. सोबत असणाऱ्या शिंदे गटातील आणि भाजपमधील मोठे नेते नाराज आहेत. पुन्हा महानाट्य होऊ नये, म्हणून 20 मंत्रिमंडळ विस्ताराच्या बावड्या उठवल्या जातात.तर मुख्यमंत्र्यांच्या डिनरला आमचे आमदार जाण्याचा प्रश्नच नाही. कदाचित तो निरोप समारंभाचा डिनर असू शकतो, असे चित्र सध्याच्या परिस्थितीतून दिसत आहे.

यावेळी वडेट्टीवार म्हणाले की, बच्चू कडू यांचा निर्णय चुकलेला आहे. कोणी त्यांच ऐकत नाही. हे त्यांना आता कळून चुकल आहे, त्यामुळे योग्यवेळी योग्य निर्णय घेतील. असं भाकित देखील केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube