‘त्यांच्या अकलेचे दिवाळे निघाले’, वडेट्टीवारांनी घेतला मनिषा कायदेंच्या वक्तव्याचा समाचार

‘त्यांच्या अकलेचे दिवाळे निघाले’, वडेट्टीवारांनी घेतला मनिषा कायदेंच्या वक्तव्याचा समाचार

Vijay Wadettiwar : आषाढी वारीत अर्बन नक्षलवाद्यांचा (Urban Naxalites) शिरकाव झाल्याचा आरोप शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी केला. तसेच या प्रकरणात सरकारने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. त्यांच्या या विधानावर आता कॉंग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाष्य केलं.

एखाद्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला… उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे महत्वाचे निरीक्षण

वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना कायंदे यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, वारी आणि वारीचा इतिहास मनिषाजींना माहीत नसेल. वारीला धर्मांधतेंचा गंध देण्याचे काम त्या करत आहे. मात्र, वारीला हिंदुत्वाचे नाव देऊन इतिहास पुसता येत नाही. वारी ही जात-पंथापलीकडचा विषय आहे. वारीमध्ये अस्पृश्यतेला थारा नाही. एकत्र मिळून पांडुरंगाच्या भेटीला जाणं, जेवण करणे हा वारीचा उद्देश आहे. मतभेद मिटवण्याचे कामंही वारीच्या माध्यमातून होत असते, असं ते म्हणाले.

BJP जिल्हाध्यक्षाचा पराक्रम; हॉटेलात दारु पिऊन महिलांना डान्स करायला लावला 

पुढं ते म्हणाले, राजकीय फायद्यासाठी वारीचा उपयोग होत असेल तर तर दुर्दैव आहे. ज्यांच्या हातात संविधान आहे, तो देशाच्या एकात्मतेवर विश्वास ठेवतो, लोकशाहीशी इमानदार असतो, देशाच्या सार्वभौमावर विश्वास ठेवतो आणि त्या व्यक्तींना नक्षली म्हणत असतील तर ह्यांच्या अकलेचे दिवाळ निघाले आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

अर्बन नक्षलीची व्याख्या काय आहे? महाराष्ट्रात कुठे अर्बन नक्षल आहेत? राज्यात अर्बन नक्षली व्यक्ती सापडला आणि सजा झाली, असा एक तरी व्यक्ती दाखवा. आता हे सरकार जनसुरक्षा नावाचे विधेयक आणून लोकांना अर्बन नक्षली ठरवणार. पत्रकारांनी सरकारच्या विरोधात लिहिलं, बोललं तर त्यांनी अर्बन नक्षली ठरवतील. जो कोणी सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोलेल, त्याला अर्बन नक्षली ठरवले जाईलं. आदिवासी माणूस हक्कासाठी उभा राहिला किंवा उद्या मी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी मोर्चा काढला तर मलाही अर्बन नक्षली घोषित करून दोन वर्षासाठी आतमध्ये टाकतील, असं ते म्हणाले.

कायंदे यांच्या वारीसंदर्भातील विधानावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अशा लोकांकडे लक्ष देऊ नका, हे कधीही पक्ष बदलतात, सोडून द्या, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी कायंदे यांच्या वक्तव्याला अधिक महत्व देण्याची गरज नसल्याचं म्हटलं.

कायंदे काय म्हणाल्या?
कायंदे म्हणाल्या की, विठुरायावर श्रद्धा असलेले लाखो वारकरी या वारीत सहभागी होत असतात. या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवावर विश्वास न मानणाऱ्या नास्तिक संघटनांचा शिरकाव झालेला आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. वेगवेगळ्या नावांखाली हे अर्बन नक्षलवादी, जसं संविधान दिंडी, पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत नावाखाली हे लोक वारीमध्ये जाऊन पथनाट्य करतात किंवा भाषणं देतात. लोकांचा बुध्दाभेद करण्यचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर त्वरीत कारवाई करावी, असं त्या म्हणाल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube