पंढरीच्या वारीमध्ये अर्बन नक्षली शिरले, आमदार मनिषा कायंदेंचा खळबळजनक दावा

पंढरीच्या वारीमध्ये अर्बन नक्षली शिरले, आमदार मनिषा कायंदेंचा खळबळजनक दावा

Manisha Kayande : राज्याभरता आषाढी वारीचा (Ashadhi Wari) उत्साह आहे. लाखो वारकरी या वारीत सहभागी झालेत. पण, या वारीत अर्बन नक्षलवाद्यांचा (Urban Naxalites) शिरकाव झाल्याचा आरोप शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी केला. तसेच या प्रकरणात सरकारने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

पाकिस्तानी सेलिब्रिटी, क्रिकेटपटूंना दिलासा; सोशल मीडिया खात्यावरील बंदी उठवली 

राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, आज सभागृहात बोलताना मनीषा कायंदे यांनी हा दावा केला. कायंदे म्हणाल्या की, अतिशय महत्वाची माहिती मी या ठिकाणी मांडत आहे. आपल्याला माहिती आहे की, जगप्रसिद्ध पंढरपूरची वारी सुरू आहे. विठुरायावर श्रद्धा असलेले लाखो वारकरी या वारीत सहभागी होत असतात. या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवावर विश्वास न मानणाऱ्या नास्तिक संघटनांचा शिरकाव झालेला आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. ही ऐकीव माहिती नसून सबळ पुरावे समोर आले आहेत, असं कायदे यांनी म्हटलं.

पुणे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस धो धो पाऊस, अलर्ट जारी 

पुढं त्या म्हणाल्या की, वेगवेगळ्या नावांखाली हे अर्बन नक्षलवादी, जसं संविधान दिंडी, पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत नावाखाली हे लोक वारीमध्ये जाऊन पथनाट्य करतात किंवा भाषणं देतात. लोकांचा बुध्दाभेद करण्यचा प्रयत्न करतात, असं त्या म्हणाल्या.

पुढं त्या म्हणाल्या, या अधिवेशनात महाराष्ट्र सरकार जनसुरक्षा विधेयक आणणार आहे. हे विधेयक देखील अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठी आहे. काही दिवसांपूर्वी काही लोकांनी वारीवर मटणाचे तुकटे टाकण्याचं काम केलं. बंडातात्या कराडकर यांनी देखील या सगळ्या विषयावर भाष्य केलं. दोन दिवसांनी आषाढी एकादशी येत आहे. शासनाने यावर त्वरीत कारवाई करावे, हे सगळे प्रकार थांबले पाहिजेत, असं कायंदे म्हणाल्या.

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?
आमदार मनीषा कायंदे यांच्या वारीसंदर्भातील विधानावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अशा लोकांकडे लक्ष देऊ नका, हे कधीही पक्ष बदलतात, सोडून द्या, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी कायंदे यांच्या वक्तव्याला अधिक महत्व देण्याची गरज नसल्याचं म्हटलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube