‘प्रकाश आंबेडकरांसाठी कोणतीही दारं बंद नाहीत’; वडेट्टीवारांनी एकदाचं सांगून टाकलं

‘प्रकाश आंबेडकरांसाठी कोणतीही दारं बंद नाहीत’; वडेट्टीवारांनी एकदाचं सांगून टाकलं

Vijay Wadettivar : नागपूरमध्ये विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी होत असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता आगामी निवडणुकाही येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीकडून जोरदार हालचाली सुरु असतानाच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी मोठं विधान केलं आहे. प्रकाश आंबेडकरांसाठी (Prakash Ambedkar) कोणतीही दारं बंद नसल्याचं सूचक विधान विजय वडेट्टीवार (Vijay Wadettvar) यांनी केलं आहे. नागपूरमधून त्यांनी माध्यामांशी संवाद साधला आहे.

a href=”httpआयटीआय आणि इंजिनिअर्संना नोकरीची संधी, RITES मध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू

इंडिया आघाडीचा घटक पक्ष वंचित बहुजन आघाडी होणार का? असा सवाल वडेट्टीवारांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांसाठी आम्ही कोणतीही दारं बंद केलेली नाहीत. आपण एकत्र येऊन मोदींना हरवू, अशी आमची प्रकाश आंबेडकरांना विनंती असल्याचंही विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

खासदारकी गेलीयं आता Mahua Moitra नेमकं काय करणार? पाच पर्याय आले समोर

यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर हल्लबोल चढवला आहे. राज्यभरातू बंजारा समाजबांधव विविध मागण्यांचे निवेदने घेऊन राज्याच्या मंत्र्यांना देण्यासाठी आले होते. यावेळी मंत्र्यांनी आंदोलकांना साधं भेटून निवेदनही स्विकारलेलं नाही. आंदोलन करण्याचा हक्क आहे, तो काय गुन्हा आहे काय? असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. तसेच बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले आहे. त्यामुळे बंजारा समाजाच्या मागण्यांवर हिवाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करणार असल्याचंही सुतोवाच विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केलं आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीकडूनही निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. तर भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने भाजपविरोधी पक्षांची मोट बांधलीयं. सर्व विरोधी पक्षांना एकत्र करुन इंडिया आघाडीची स्थापना काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

इंडिया आघाडीत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, ठाकरे गट सामिल आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी अद्याप इंडिया आघाडीचा घटक पक्ष असल्याचं जाहीर करण्यात आलेलं नाही. त्या दृष्टीने वंचितकडूनही प्रतिसाद मिळत असून मात्र, अद्याप युती झालेली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत वंचित इंडिया आघाडीचा घटक पक्ष असणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहेय

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube