मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचाVSR च्या विमानातून प्रवास

अजित पवार पुण्याहून बारामतीला जाताना व्हीएसआरच्या प्रायव्हेट जेटनं निघाले होते. त्या विमानाचा अपघात बारामती विमानतळाजवळ झाला होता.

  • Written By: Published:
News Photo   2026 02 27T193318.340

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा (Fadanvis) अपघात झाल्यापासून व्हीएसआर व्हेंचर्स कंपनी चर्चेत आहे. डीजीसीएनं व्हीएसआरच्या चार विमानांना ग्राऊंड करण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकच्या चौथे विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यंत्र्यांनी व्हीएसआरच्या विमानाचा वापर केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा

पवार, मंत्री छगन भुजबळ यांनी VSR व्हेंचर्सच्याच विमानाने प्रवास केला आहे. चौथे विश्व मराठी संमेलनच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार होते, मात्र एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिले. एकनाथ शिंदे यांनी व्हीएसआरची विमानं वापरू नये अशी भूमिका सेनेच्या नेत्यांनी घेतली आहे.

अजित पवार अपघात प्रकरणात CID ची एंट्री; DGCA ची VSR वर कारवाई; CID तपासात नवे पुरावे समोर

अजित पवार पुण्याहून बारामतीला जाताना व्हीएसआरच्या प्रायव्हेट जेटनं निघाले होते. त्या विमानाचा अपघात बारामती विमानतळाजवळ झाला होता. त्यानंतर व्हीएसआर व्हेंचर्स कंपनी वादात अडकली होती. दरम्यान, मराठी भाषा विभाग शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्याकडं असल्याने एकनाथ शिंदे उपस्थित राहतील अशी, शक्यता होती मात्र ते आले नाहीत. शिक्षण मंत्री दादा भुसे नाशिकचे असूनही ही ते या कार्यक्रमाला नव्हते.

रोहित पवार कंपनीविरोधात

व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे. इथे दादांचे समर्थक, दादांचे प्रेमी आणि बारामतीचे नागरिक जमले आहेत आणि संबंधित कंपनीवरती गुन्हा दाखल व्हावा, योग्य ती कारवाई व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे, आम्ही सगळे रोहित दादांच्या मागे उभे आहोत. अजित दादांना न्याय मिळाला पाहिजे, या प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे असं रोहित पवार म्हणाले.

follow us