दादाशी वाद घालणार नाही, मोठा भाऊच राहणार, फुटीवर सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं…
Supriya Sule : अजितदादा आणि माझ्यात कधीच वाद होऊ शकत नाहीत, दादा आयुष्यभर माझा मोठा भाऊच राहणार असल्याचं स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. रात्री उशिराने मुंबईत सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या घडामोडींवर थेट भाष्य केलं आहे.
Maharashtra Rain : पावसाचा जोर वाढणार! पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात ऑरेंज अलर्ट…
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवारांशी माझी तब्बल तीन तास चर्चा झाली होती. माझी कायमच पर्याय शोधण्याची भूमिका असते. दादांच्या भूमिकेनंतर माझा आणि दादांचा कधीही वाद होऊ शकत नाही. मी देखील कधीच वाद घालणार नसून यापुढेही वाद होणार नसल्याची जणू ग्वाहीच सुप्रिया सुळेंनी दिली आहे. तसेच दादा आयुष्यभर माझ्यासाठी मोठा भाऊच राहणार असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.
अजित पवारांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती होताच नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून जल्लोष…
याआधीही शरद पवारांसोबत अशा गोष्टी घडलेल्या आहेत. 1980 जी पुनरावृत्ती पुन्हा होईल की नाही हे येणारा काळच ठरवणार असून मी आयुष्यात प्रत्येक नात्यात पर्याय काढण्यावरच भर देते. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार असतो. हा अधिकार आपल्याला संविधानाने दिला जसा सर्वसामान्य नागरिकाला दिला तसाच दादालाही दिला असल्याचं सुळेंनी सांगितलं आहे.
अजितदादांना उपमुखमंत्रीपदाची घाई; राज्यपालांच्या सुचनेपूर्वीच शपथविधीला सुरुवात
अजितदादा आणि माझ्यात राजकीय नातं आणि बहिण भावाच नातं हे दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी आणण्याची गल्लत कधी करीत नाही. तसेच अजित पवारांच्या शपथविधीबाबत मला काहीच माहिती नव्हती, असं सुळेंनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, अजित पवारांनी काल घेतलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीनंतर थेट राजभवन गाठत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. एवढंच नाहीतर अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केलायं. या सर्व घडामोडींवर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा नसून आम्हाला चिंता नसल्याचं स्पष्ट केलं आहे.