G 20 परिषदेच्या बैठकीदरम्यान आंदोलन करणार; नामांतरावरून Jaleel यांचा सूचक इशारा

G 20 परिषदेच्या बैठकीदरम्यान आंदोलन करणार; नामांतरावरून Jaleel यांचा सूचक इशारा

छत्रपती संभाजीनगर : गेल्या ३० वर्षांपेक्षा जास्त काळापासून औरंगाबादचे (Aurangabad) छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar) आणि उस्मानाबादचे (Osmanabad) जिल्ह्याचं धाराशिव (Dharashiv) नामांतर करण्याचा मुद्दा प्रलंबित होता. या दरम्यान शुक्रवारी (24 फेब्रुवारी) रोजी केंद्राने या शहरांचे नावं बदलण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे.

मात्र या निर्णयाला आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी विरोध केला. सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी मोठा लढा उभा करणार आहे, रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा जलील यांनी दिला आहे. तर जी 20 (G 20) परिषदेच्या औरंगाबादमध्ये बैठकीच्या दरम्यान आंदोलन करण्याचा देखील त्यांनी सूचक इशारा दिला.

यावेळी बोलताना जलील म्हणाले की, फडणवीस साहेब हा जिल्हा माझा आहे, कोणाच्या बापाचा नाही. कोणीही माझ्या शहरात येणार आणि हे नाव द्यायचं, ते नाव द्यायचं हा धंदे सुरु आहे का ? जोरदार हल्लाबोल जलील यांनी केला. जी 20 परिषदेची औरंगाबाद शहरात होणाऱ्या बैठकीच्या दिवशी मी जर विरोध केला तर काय करणार ? मी जगाला दाखवणार आहे की, हे घाणेरडे राजकारण करत आहेत. आता फडणवीस गृहमंत्री आहेत ना आता त्यांना दाखवतो, मी मोठं आंदोलन उभं करणार असल्याचे सूचक इशारा त्यांनी यावेळी दिला.

पुढे बोलताना जलील म्हणाले की, केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे एक औरंगाबादकर म्हणून मला याचा दुःख आहे. ज्या लोकांना या निर्णयाने आनंद होत आहे, त्यांना सांगतो की ? सरकार तुमची आहे. तुम्ही निर्णय घेतला आहे आणि तुम्ही करत राहणार आहेत. पण ज्यांचे नाव शहराला दिला त्यांचा दर्जा शहराला देणार आहे का ? असेही जलील यावेळी म्हणाले. कायम ८ दिवसांनी मिळणारे पाणी उद्यापासून २ वेळा पाणी मिळणार आहे का ? असे सवाल तुमच्यासमोर उपस्थित करत असल्याचे जलील यावेळी म्हणाले.

ShivSena (UBT) : ठाकरे गट पिंजून काढणार महाराष्ट्र, आजपासून ‘शिवगर्जना अभियान’

जलील यांचे ट्वीट…
याविषयी जलील यांनी ट्वीट करत सांगितले आहे की,”औरंगाबाद आमचे शहर आहे, होते आणि राहील. आता औरंगाबादकरिता आमच्या शक्ती प्रदर्शनाची वाट पाहा. आपल्या लाडक्या शहरासाठी भव्य मोर्चा… आमच्या शहराच्या नावावर राजकारण करणाऱ्या भाजपच्या शक्तींचा पराभव करण्यासाठी औरंगाबादवासियांनो सज्ज व्हा, आम्ही निषेध करतो आणि आम्ही लढू….” असे जलील यांनी यावेळी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कायम आमचा विरोध असणारच…
शहरांच्या नामांतराच्या निर्णयाला आम्ही अगोदरपासूनच विरोध केला आहे. दरम्यान औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नावं बदलण्याचा जो केंद्राने निर्णय घेतला आहे, त्याला देखील आमचा विरोध आहे. याकरिता न्यायालयात आमची कायदेशीर लढाई सुरु आहे, आणखी लढा याकरिता उभा करणार असल्याचे जलील म्हणाले. संभाजी महाराजांविषयी आमच्या मनात कायम आदर आहे. मात्र भाजपकडून शहरांचे नावं बदलून जे काही घाणेरडे राजकारण करत आहे, त्याला मात्र आमचा विरोध होता, आहे आणि राहणार असल्याचं जलील म्हणाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube