100 बीट मार्शल, 25 दामिनी पथके अन् 24 तास पोलिस चौक्या सुरु, पोलिस आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये…

100 बीट मार्शल, 25 दामिनी पथके अन् 24 तास पोलिस चौक्या सुरु, पोलिस आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये…

पुण्यात गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. पुणे पोलिसांकडून नव्या 25 दामिनी पथके निर्माण करण्यात येणार आहेत. एवढंच नाहीतर 100 बीट मार्शलची संख्या वाढवण्यात आली आहे. यासोबतच शहरातील पोलिस चौक्या 24 तास सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली आहे.

Video : ‘लढाई होती देव, देश अन् धर्मासाठी’; वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेकडून खास व्हिडीओ जारी

आयुक्त म्हणाले, तरुणीवर हल्ला झाला ही घटना दुर्देवीच आहे, या घटनेची आम्ही गांभीर्याने दखल घेतली आहे. तरुणींना समुदेशनाचीही कारवाई पोलिस प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यासोबतच शहरात याआधीही दामिनी पथके होतीच पण आता नव्याने 25 पथकांची निर्मिती करण्यात येणार असल्याचंही आयुक्त कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

Mumbai Girl Molestation in Local : धावत्या लोकलमध्ये तरुणाचे अश्लिल चाळे, आरडाओरडा होताच ठोकली धूम…

तसेच हल्ल्याच्या घटनांवर वॉच ठेवण्यासाठी पुणे शहरांत पोलिस चौक्या 24 तास सुरु ठेवण्यात येणार आहेत. या चौक्यांमध्ये दोन शिफ्टमध्ये काम करण्यात येणार असून सीसीटीव्हीदेखील लावण्यात येणार असल्याचं पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी स्पष्ट केंल आहे. त्यामुळे आता पुण्यात घडणाऱ्या हल्ल्याच्या घटनांवर पोलिसांचा वॉच राहणार आहे.

यासोबत शहरातील शाळा, कॉलेजेस, आणि झोपडपट्यांमध्ये आम्ही तरुण-तरुणींचं समुपदेशन करणार आहोत. काही तरुणी बदनामीच्या भीतीने तक्रार दाखल करीत नाहीत त्यांच्यासाठी तक्रार बॉक्स तयार करण्यात येणार असल्याचंही पोलिस आयुक्तांनी सांगितलं आहे.

आझाद यांच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी; विरोधकांना डिवचत आठवले म्हणाले, पुन्हा मोदीच PM

पुण्यामध्ये दर्शना पवार हत्याकांडाची घटना ताजी असतानाच, मंगळवारी पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली. भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ या गजबजलेल्या भागामध्ये एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. दर्शना पवार प्रमाणेच या तरुणीवर देखील एकतर्फी प्रेमातूनच हा हल्ला झाला. मात्र लेशपाल जवळगे या तरुणाने या मुलीला वाचवलं. त्यातच आता पुण्यात दिवसाढवळ्या अशा घटना घडत असल्याने पुणे पोलिसांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तांनी तीन पोलिसांना निलंबित केले आहे.

दरम्यान, पुण्यात काही दिवसांपूर्वीच एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवारची हत्या करण्यात आली. राजगडाच्या पायथ्याशी दर्शना पवारचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पुण्यातल्या सदाशिव पेठेत एका विद्यार्थीनीवर युवकाकडून हल्ला करण्याचा प्रकार घडला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच विवाहित तरुणीनेच प्रियकर तरुणाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube