तानाजी सावंतांना विरोध करणाऱ्या अधिकाऱ्याचा पाय आणखी खोलात : सरकारने धाडली नोटीस

तानाजी सावंतांना विरोध करणाऱ्या अधिकाऱ्याचा पाय आणखी खोलात : सरकारने धाडली नोटीस

पुणे : महानगरपालिकेचे निलंबित आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार (Bhagwan Pawar) यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. निलंबनाविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठविलेले निवेदन माध्यमांमध्ये व्हायरल केल्याप्रकरणी सरकारकडून डॉ. पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पुढच्या तीन दिवसांत या नोटीसला उत्तर न दिल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. (A show cause notice has been issued to Bhagwan Pawar.)

काही दिवसांपूर्वी प्रलंबित तक्रारींची दखल घेत डॉ. भगवान पवार यांचे निलंबन करण्यात आले होते. मात्र आपले हे प्रकरण आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना विरोध केल्याने झाल्याचा दावा डॉ. पवार यांनी केला होता. मंत्र्यांनी कात्रजच्या कार्यालयात बोलावून नियमबाह्य टेंडरचे कामे करण्यासाठी आणि इतर खरेदी प्रकरणात दबाव आणला होता. नियमबाह्य कामे केले नाही म्हणून जुन्या कामांमध्ये चौकशी समिती नेमून निलंबित केले असा दावा त्यांनी केला होता.

2 तासांत 14 फोन अन् डॉक्टरनेच दिला रक्त बदलण्याचा सल्ला; ‘लाडल्या’ला वाचविण्याचा बापाची धडपड

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. डॉ. भगवान अंतू पवार यांच्याविरुद्ध आर्थिक भ्रष्टाचार, लैंगिक छळ आदीं विविध तक्रारी प्राप्त होत्या. या प्रलंबित तक्रारींची दखल राज्य शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने घेतली आणि सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीने महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार त्यांचे निलंबन करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले होते. दरम्यान, आता शासनाकडून पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

‘कथित’ शब्दाचा वाद, काँग्रेसच्या फजितीनंतर अय्यरांचा माफीनामा; नेमकं काय घडलं?

पवार यांनी 24 मे रोजी विहित मार्गाने हे निवेदन शासनाला दिले होते. प्रत्यक्षात 25 मे रोजी शनिवार आणि 26 मे रोजी रविवार असल्याने सुट्टी होती. त्यामुळे हे निवेदन पत्र शासनाला 27 मे रोजी मिळाले. पण त्यापूर्वीच पवार यांच्या निवेदनाच्या बातम्या माध्यमे आणि वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्या. अनेक लोकप्रतिनिधींनीही त्या समाजमाध्यमांवर पोस्ट केल्या. यामुळे शासनाची बदनामी झाली. त्यामुळे या नोटिशीद्वारे आपल्याकडे खुलासा मागविण्यात येत आहे. याचा तीन दिवसांत खुलासा न केल्यास डॉ. भगवान पवार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात येईल, असे म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज