ज्ञानेश्वरांच्या जीवनकार्याचे सजीव दर्शन; ग्रंथदिंडीतून विद्यार्थ्यांनी उलगडले संत ज्ञानेश्वरांचे जीवनदर्शन

Sant Dnyaneshwar : हिंजवडी येथील आय. स्क्वेअर आयटी महाविद्यालयात वाचक मंच व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथदिंडीने

  • Written By: Published:
Sant Dnyaneshwar

Sant Dnyaneshwar : हिंजवडी येथील आय. स्क्वेअर आयटी महाविद्यालयात वाचक मंच व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथदिंडीने विद्यार्थ्यांच्या सहभागातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनकार्याचे सजीव दर्शन घडवले. हा उपक्रम भक्तिभावपूर्ण, शिस्तबद्ध आणि सांस्कृतिक वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे, आय. स्क्वेअर आयटी महाविद्यालयात ग्रंथदिंडीचा उपक्रम सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आला.

यावर्षी ग्रंथदिंडीची संकल्पना संत ज्ञानेश्वर यांच्या जीवन व कार्यावर आधारित होती. देवगिरीचा पराभव, पैठण येथील शास्त्रार्थ, भावार्थ दीपिका (ज्ञानेश्वरी) यांचे कथन, आषाढी एकादशीची वारी, चांगदेव महाराजांशी झालेली ऐतिहासिक भेट तसेच संजीवन समाधी यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रसंगांचे नाट्यरूप सादरीकरण विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे केले.

वारकरी वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय केला. वारीतील रिंगणात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमातून संत साहित्य, अध्यात्म आणि महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे मोल अधोरेखित झाले. विद्यार्थ्यांमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या विचारांची व सामाजिक संदेशांची जाणीव अधिक दृढ झाली.

मंत्री अनुराग ठाकूर यांच्या बेल्टची किंमत 1 लाख रुपये? नवीन वादाला सुरुवात

या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली पाटील, प्राध्यापकवर्ग तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा उपक्रमांमुळे आधुनिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक व आध्यात्मिक संस्कार घडविण्यास हातभार लागत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

follow us