विद्यापीठात तोडफोडप्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हे, ABVP ने आरोप फेटाळले

विद्यापीठात तोडफोडप्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हे, ABVP ने आरोप फेटाळले

ABVP On Pune university Strike : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रॅप सॉंग चित्रीकरण व अन्य मागण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आलं.

दरम्यान, आंदोलन करत असताना तोडफोड, घोषणाबाजी सोबत केलेल्या गोंधळामुळे यामुळे विद्यापीठातील सुरक्षा अधिकारी सुधीर दळवी (वय – 50) यांनी चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये संबंधित आंदोलकाविरोधात फिर्याद दिली. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी 20 जणांवर सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

मात्र ABVP ने हे आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणावर स्पष्टीकरण देणारं पत्रक काढत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या पत्रकामध्ये म्हटले आहे की, ‘कुलगुरूंनी दिलेल्या हीन वागणूकीमुळे अभाविप कार्यकर्त्यांचे रूपांतर आक्रमकतेमध्ये झाले. अभाविप कार्यकर्ते सभागृहाच्या उजव्या दरवाजा बाहेर बसले होते.अभाविप कार्यकर्ते त्याच दरवाज्याने आतमध्ये आले आणि सन्माननीय कुलगुरूंसमोर मागण्या मांडल्या. काही प्रसारमाध्यमे व विशिष्ट राजकीय नेत्यांकडून ‘तोडफोड झाली’ ही अतिशय चुकीची बातमी पसरवली गेली. तस बघितल तर ह्याच सन्मानीय राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ह्या रॅपरवर कारवाई करू नये ही मागणी केली होती. त्यामुळे नैतिकतेवर ह्यांनी किती बोलावे हे मोठे प्रश्नचिन्हच आहे.’

विद्यापीठात तोडफोड करणं पडलं महागात ABVP च्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल…

पत्रकात असं देखील म्हटलं आहे की, ‘एकीकडे विद्यापीठामध्ये दारूच्या बाटल्या , तलवार ,बंदूक घेऊन rap song करण्यास विद्यापीठ प्रशासन तोंडी परवानगी देते ,विषय बाहेर आल्यानंतर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई करत नाही दुसरीकडे संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दडपण्यासाठी मात्र विद्यापीठ प्रशासन पोलीस फौजफाटा बोलावते हे अत्यंत वेदनादायी दृश्य अभाविप कार्यकर्त्यांसाठी होते.’

‘अभाविप कार्यकर्ते ज्या सभागृहातील उजव्या बाजूस असलेल्या दरवाजामधून आत मध्ये आले तो दरवाजा अजून देखील नीट अवस्थेत आहे. जी तथाकथित तोडफोड झाली असा कांगावा काही प्रसार माध्यमे व राजकीय नेते करीत आहेत त्याचा आणि अभाविप चा दुरान्वये ही संबंध नाही असे मत पुणे महानगर मंत्री शूभंकर बाचल यांनी दिले.’

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube