Video : लवकरच गुड न्यूज! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र…, अजित गव्हाणे यांचं लेट्सअप मराठीवर मोठं वक्तव्य
भोसरी विधानसभेत 48 नगरसेवकांमध्ये 14 नगरसेवक होते, आता दुप्पट म्हणजे 28 येतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ही महानगरपालिका निवडणूक आहे. (Pune) या पताळीवर मतदार हे पक्षापेक्षा उमेदवाराकडं पाहतात. आता पिंपरी चिंचवड जर पाहिलं तर हे मिनी भारत आहे. सर्वच जाती-धर्माचे लोक इथ आहेत. या लोकांच्या जगण्याशी संबंधीत सगळे प्रश्न आहेत. त्यामुळे या लोकांना जात किंवा धर्म अशा मुद्यांमध्ये फार रस नाही. त्यांना झालेला किंवा होणारा विकास महत्वाचा आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात मोठा विकास झालेला आहे, आजही लोकांचा अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे असं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अजित गव्हाणे म्हणाले आहेत. लेट्सअप मराठीच्या विशेष कार्यक्रमात बोलत होते.
70 लाखांचा रस्ता सात कोटीत हे जे रस्त्याचे प्रकरण आहे तो रस्ता कुठ आहे असं विचारल्यावर गव्हाणे म्हणाले, 70 लाखांचा रस्ता 7 कोटी दाखवला. विषेश म्हणजे या पुलाचा कुणीच वापर करत नाही असा हा चुकीचा कारभार आहे, असा थेट आरोप गव्हाणे यांनी भाजपवर नाव न घेता केला. तसंच, तुम्ही हे मुद्दे मांडायला निवडणुकांची वाट का पाहिली या प्रश्नावर हे मुद्दे विधानसभा असो किंवा महापालिका असो सर्व ठिकाणी मांडले आहेत. परंतु, सत्तेच्या दबावात हे मुद्दे विरले. त्यामुळे आता या महापालिकेच्या निमीत्ताने दादा हे मुद्दे मांडत आहेत असंही गव्हाणे म्हणाले.
तुम्ही का निवडणुकीला का उभे राहिले नाहीत असं विचारल असता, मी विधानसभा निवडणूक लढलो. मी चारवेळा नगरसेवक म्हणून चांगलं काम केलं आहे. त्या लोकांचाच मला भोसरी विधानसभा निवडणूक लढवल्यावर पाठिंबा मिळाला. आणि आता विधानसभा लढवल्यानंतर, लोकांचा पाठिंबा असल्यावर आता मी निर्णय घेतला की विधानसभाच लढायची महापालिका नाही लढली पाहिजे असंही गव्हाणे म्हणाले. तसंच, सर्व निवडणूक पातळीवर कुणीतरही लक्ष द्यायला कुणीतरी पाहिजे आणि सर्वच आपल्याला नको, घराणेशाही नको, दुसरी कुणालाही संधी मिळाली पाहिजे या मताने मी निवडणुकीत नाही असंही ते म्हणाले.
पिंपरी चिंचवडमध्ये अबकी बार 100 पार; हा नारा यशस्वी ठरेल, आमदार जगताप यांनी व्यक्त केला विश्वास
भोसरी विधानसभेत 48 नगरसेवकांमध्ये 14 नगरसेवक होते, आता दुप्पट म्हणजे 28 येतील असं म्हणत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आमची सत्ता येईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या अजित पवार ज्या पातळीवर प्रचार करत आहेत त्या पातळीवर समोरून प्रचार होत नाही असंही गव्हाणे म्हणाले. यावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत ते बर वातावरण आहे का? त्यावर बोलताना गव्हाणे म्हणाले, दोन्ही बाजूने एकोप्याने काम झालं आणि हे पुढही होत राहील. इतकच नाही तर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात अशी इच्छा असल्याचंही गव्हाणे यांनी यावेळी बोलून दाखवली. आजही पवार साहेबांचा विषय काढला तर अजित पवार भावनीक होतात असंही ते म्हणाले.
कुदळवाडी प्रकरण पाहता पिंपरी चिंचवड हिंदुत्ववादी मतदारसंघा झालाय का? यावर बोलताना गव्हाणे म्हणाले, अस अजिबात नाही. हा एक मिनी भारतच आहे. सर्वच जाती धर्माचे लोक आहेत. कुणीच अस जातीवाचक किवा धर्माच्या आधारावर इथं वागत नाहीत. आज आमच्या कार्यक्रमाला ते लोक येतात आणि त्यांच्या कार्यक्रमाला आम्ही जातो. दुजाभाव म्हणून अस काहीच नाही, असं म्हणत या मतदारसंघालाच नाही तर देशालाच शिक्षण, विकास या मुद्यावर पुढं गेल पाहिजे असंही ते म्हणाले. मुस्लिम समाज म्हणूनच नाही सर्वांना आम्ही सोबत घेऊ आणि सर्वांचा विकास करू असाही विश्वास त्यांनी व्यक्त यावेळी केला.
