सुधारणा करा, अमृता फडणवीसांची तक्रार, अजित पवारांच्या पुण्यावर फडणवीसांचं विशेष लक्ष?

Amruta Fadanvis Complaint About Pune City to Devendra Fadanvis : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये रस्सीखेच निर्माण झाली आहे. असं दिसत आहे. कारण युतीतील शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या पक्षांनी कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. तसेच जोरदार पक्षप्रवेश देखील सुरू आहेत. या दरम्यान अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यामध्ये स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे. अशी मागणी करणार असल्याचं वक्तव्य फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी पुण्यामध्येच केलं आहे.
रहस्यमय प्रेमाची एक अद्भुत कहाणी! 21 नोव्हेंबरला उलगडणार ‘असंभव’चा थरार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस या पुण्यामध्ये एका कार्यक्रमाला आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात बोलताना पुणे शहराशी आपलं खास नातं असल्याचं सांगितलं. तसेच त्यांनी येथे काही समस्या आहेत. त्यामुळे काही सुधारणा करणे गरजेचे आहे. त्याची तक्रार मी फडणवीसांकडे करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
अमृता फडणवीस म्हणाल्या की, या शहरात माझी आजी राहते. त्यामुळे मला इथे आल्यावर माहेरी आल्या सारखं वाटतं. येथील लोक आणि वातावरणाविषयी मला खूप आपुलकी वाटते. त्यामुळे मी दरवेळी इथे आल्यानंतर देवेंद्रजींना येथील कमतरतांबद्दल सांगत असते. काय सुधारणा करणे गरजेचे आहे? तसेच फडणवीस देखील पुण्याकडे तेव्हडचं लक्ष देतात. अशी माहिती अमृता फडणवीस यांनी दिली.
यानिक सिनरने जिंकला विम्बल्डन 2025चा किताब, मिळाले कोटींचे बक्षीस
दरम्यान दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवार कामाला लागले आहेत. त्याबबात त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती होईल कींवा नाही. हे अद्याप स्पष्ट नाही. पण तुम्ही तयारीला लागा. यामध्ये पुणे मनपामध्ये हे आदेश देण्यात आल्याने पुण्यामध्ये अजित पवारांचा पक्ष स्वबळावर लढणार की काय? अशी चर्चा सुरू आहे. त्यात आता अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यामध्ये स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यास येथे आणखी रंगत येणार एवढं नक्की.