Video : ‘नाही.. नाही… नाही’ जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंचा त्रिवार नकार; स्पष्टीकरणही दिलं

Video : ‘नाही.. नाही… नाही’ जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंचा त्रिवार नकार; स्पष्टीकरणही दिलं

Supriya Sule Reaction On Jayant Patil Resign : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वर्धापनदिनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात जयंत पाटलांनी (Jayant Patil) पक्षप्रमुख शरद पवारांकडे प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळेंची (Supriya Sule) प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यामुळे मोठा ट्विस्ट आल्याचं दिसतंय.

जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता सुळे यांनी त्रिवार नकार दिला. जयंत पाटील यांचा राजीनामा मी तुमच्या चॅनेलवर पाहिला, पण मी स्वतः पाहिलेला नाही. मी जयंत पाटील यांच्याशी रोज बोलते. ते संघर्ष करणारे नेते आहेत, असं त्या म्हणाल्या आहेत.

सायना नेहवाल – पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, लग्नाच्या 7 वर्षानंतर फुलराणीच्या प्रेमकहानीचा अंत

सरकारचा नाकार्तेपणा

हिंजवडी ते कात्रज चौक या मार्गावर वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, “हिंजवडी ते कात्रज चौक असा मी दर आठवड्याला आढावा घेत असते. नियोजन नसताना रस्ते खोदले गेले असून या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. उशिरा का होईना, सरकार आता हिंजवडीकडे लक्ष घालतंय, पण आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आलोय. सरकारच्या नाकर्तेपणामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचा आरोप करत सुळे म्हणाल्या, पालकमंत्र्यांनी आढावा घेतलाय, बघूया आता काय होतं ते.

पहिल्या लिस्टमध्ये रोहित पवार 

गुडलक कॅफेत घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, मी आणि शरद पवार प्रवीण गायकवाड यांच्याशी बोललो आहोत, घटनेचा निषेध करतो. त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. हल्लेखोरांवर कारवाई होत नसल्याचं हे धक्कादायक आहे. रोहित पवार यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप करत त्या म्हणाल्या, पहिल्या लिस्टमध्ये रोहितचं नाव नव्हतं. विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं जातंय. मी आणि रोहित विरोधक आहोत म्हणूनच आमच्यावर आरोप होत नाहीत. त्यांच्या जवळून पिस्तूल आढळून आलं आहे. मी हे सर्व मुद्दे दिल्ली दरबारी मांडणार आहे.

ब्रेकिंग! उड्डाणानंतरच लागली विमानाला आग, एअरपोर्टवरच कोसळलं; 15 जणांचा मृत्यू

नोटबंदीचं काय झालं?

नोटबंदीवर भाष्य करत सुळे म्हणाल्या, मंत्री मारत आहेत, पैसे सापडत आहेत. नोटबंदीचं काय झालं? ब्लँक मनी हटवण्यासाठी नोटबंदी आणली होती, पण आता मंत्र्यांच्या घरी नोटांच्या बॅगा सापडत आहेत. हे चिंताजनक असून मी निर्मला सीतारामन यांच्याकडे हा मुद्दा मांडणार आहे. यावेळी सरकारवर टीका करत सुळे म्हणाल्या, राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. हे सरकारचे अपयश आहे. भाजपमध्ये आज 100 टक्के काँग्रेसवाले आहेत. संजय जगताप, संग्राम थोपटे हे सगळे कधी ना कधी काँग्रेसमध्ये होते. सर्व टॅलेंट काँग्रेसमध्येच आहे, तुमच्यात नाही का?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube