Shahzad Bhatti : ATS चे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये छापे ; नेमकं कारण काय?

Shahzad Bhatti : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संबंधित एका संशयास्पद नेटवर्कविरुद्ध राज्यात गेल्या काही दिवसांपासून एटीएसने मोठी

Shahzad Bhatti

Shahzad Bhatti : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संबंधित एका संशयास्पद नेटवर्कविरुद्ध राज्यात गेल्या काही दिवसांपासून एटीएसने मोठी कारवाई सुरु केली आहे. या कारवाई दरम्यान एटीएसकडून राज्यातील अनेक शहरात छापेमारी सुरु आहे. तर दुसरीकडे आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये छापे टाकण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भट्टी आणि त्याचे साथीदार तरुणांशी संपर्क साधण्यासाठी व त्यांना प्रभावित करण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपचा वापर करत होते. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा एटीएसकडून (ATS) सखोल चौकशी सुरु असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या संपर्क जाळ्याचा आणि त्यामागील उद्देशाचा शोध एटीएसकडून घेतला जात आहे. या प्रकरणात आणखी काही महत्त्वाच माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे एटीएसने या प्रकरणात अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात देखील छापे टाकले आहे. तसेच धुळे, मुंबई आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये एटीएसकडून छापे टाकण्यात आले आहे.

सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरच प्रश्नचिन्ह; नोटिशीमागे नेमकं डोकं कुणाचं ?

follow us