औंध-बोपोडीत पाच ठिकाणी सार्वजनिक वसुबारस पूजनाचे आयोजन; नगरसेवक सनी निम्हण यांचे नागरिकांना कुटुंबासह सहभागी होण्याचे आवाहन

Municipal Councillor Sunny Nimhann; औंध-बोपोडीत नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकाराने 5 ठिकाणी सार्वजनिक वसुबारस पूजनाचे आयोजन.

Aundh Bopodi Vasubaras Municipal Councillor Sunny Nimhann

Aundh Bopodi Vasubaras Municipal Councillor Sunny Nimhann: पुणे : दिवाळीच्या मंगलमय पर्वाची सुरुवात वसुबारस या सणाने होते. भारतीय संस्कृतीत गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व असून, वसुबारसच्या दिवशी गायीचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. ही परंपरा जपण्याबरोबरच नागरिकांना एकत्रितपणे वसुबारस साजरी करता यावी, यासाठी औंध-बोपोडी परिसरात गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी पाच ठिकाणी सार्वजनिक वसुबारस पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

भावाच्या गोष्टीत बहिणींच्या नात्याचा हळवा स्पर्श; ‘बंधू’मध्ये मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे प्रथमच एकत्र!

सायंकाळी ६ ते ८ या वेळेत हा उपक्रम पार पडणार आहे. यामध्ये परिहार चौक, चंद्रकांत गायकवाड चौक (मेडिपॉईंट हॉस्पिटलजवळ), भाले चौक (नागरस रोड), अमित मुरकुटे संपर्क कार्यालय (बोपोडी) आणि पुणे आयटी पार्क (भाऊ पाटील रोड, बोपोडी) या पाच ठिकाणी नागरिकांना वसुबारस पूजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पत्नीला ‘बेअक्कल’ म्हणणं क्रूर गुन्हा नाही…हुंडाबळीच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा!

गेली अनेक वर्षे या उपक्रमाच्या माध्यमातून औंध-बोपोडी परिसरातील नागरिकांना एकत्र येऊन वसुबारस साजरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. सण-उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक एकोपा वाढावा, नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची आणि परंपरांची ओळख व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

“आपले सण आणि परंपरा ही आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे. वसुबारसच्या निमित्ताने नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह सहभागी होऊन गोमातेचे पूजन करावे आणि आनंदाने दिवाळीच्या उत्सवाची सुरुवात करावी,” असे आवाहन आयोजक तथा नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी केले आहे.

जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी सुरू; समितीकडून क्लिपची मागणी, जरांगेंनी घातली अट

आपली परंपरा, आपला सण, आपला उत्सव! या भावनेतून सर्व औंध-बोपोडीकरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

follow us