Big Breaking : भाजप गटनेते बिडकरांकडे मागितली २५ लाखांची खंडणी!

Big Breaking : भाजप गटनेते बिडकरांकडे मागितली २५ लाखांची खंडणी!

Ganesh Bidkar Extortion Case : भाजपच्या पुण्यातील नेत्यांना खंडणीच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. गेल्या महिनाभरात दुसरी घटना घडली आहे. भाजपचे पुणे महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर यांच्याकडे व्हाट्सएप कॉलद्वारे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका बांधकाम व्यावसायिकाकडे ३ कोटींची खंडणी मागितली होती. त्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता दुसरा प्रकार समोर आला आहे.

गणेश बिडकर हे राजकीय जीवनात काम करत असून त्यांच्या बदनामीच्या हेतूने हा कॉल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या प्रकारानंतर बिडकर यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सायबर पोलिसांनी सुरू केला आहे.

‘हा तर काळाराम मंदिराच्या सनातन्यांचा माजोरडेपणा’ ; आव्हाडांनी झापले ! – Letsupp

पुणे शहर भाजपच्या नेत्यांना टार्गेट करून खंडणी मागितल्याची ही महिन्याभरातील दुसरी घटना असल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गणेश बिडकर (वय ५०, रा. ३१६, सोमवार पेठ) यांनी पुण्याच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

बिडकर यांनी सांगितले की, मी ३० मार्च रोजी श्रीराम नवमी निमित्त मिरवणुकीत असताना मला व्हाट्सएपवरून एक कॉल आला. त्याने मला हिंदी आणि मराठी भाषेतून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यात तो माणूस म्हटला की, तुला राजकीय मस्ती आली आहे. तेरे पास बहोत पैसा हो गया है, तू चुपचाप २५ लाख रुपये दे तुने अगर पैसे नही दिये तो तू देख कैसा खेल शुरु होनेवाला है, अशी धमकी देत त्या माणसाने शिवीगाळ केली.

(248) Nitin Gadkari : गडकरींच्या डोक्यात ‘उजनी’साठी खास प्लॅन | LetsUpp Marathi – YouTube

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube