चांदणी चौकाच्या कार्यक्रमात मेधा कुलकर्णी अन् भाजप नेत्यांमध्ये लपंडाव…
पुणे : पुण्यातील चांदणी चौकतील नव्या उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादादेखील उपस्थित होते. परंतु, या सर्व कार्यक्रमामध्ये लक्ष वेधलं ते भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी. कालच्या (दि. 11) नाराजी नाट्यानंतर मेधा कुलकर्णी या चांदणी चौकातील कर्यक्रमाठिकाणी उपस्थित होत्या. पंरतु, त्या एकाकी पडल्याचे चित्र दिसून आले. कार्यक्रम संपल्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी चांदणी चौकातील कार्यक्रमाचा आनंद घेऊया म्हणत अधिकचे बोलणे टाळले. पण त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्ट दिसून येत होती.
ब्रिटीश कायदा रद्द, पण त्यांच्यापेक्षा भयंकर… संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका
चांदणी चौकतील उड्डाणपुलासाठी मेधा कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, त्यानंतरही आजच्या कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या पत्रिकेत मेधा कुलकर्णी यांचे नाव छापण्यात आले नव्हते. तसेच त्यांना आमंत्रणही देण्यात आले नव्हते. या सर्व घडामोडींमध्ये मेधा कुलकर्णी यांनी एक फेसबुक पोस्ट लिहित मनातील नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. त्यानंतर पुणे भाजपमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.
कार्यक्रमस्थळी मेधा कुलकर्णी एकाकी
मेधा कुलकर्णी यांच्या नाराजी नाट्यानंतर त्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण, मेधा कुलकर्णी या कार्यक्रमस्थळी उपस्थित झाल्या. परंतु, त्यांनी या विषयावर भाष्य करणे टाळत थेट कार्यक्रमस्थळी उभारलेल्या छोट्याखानी मंडपात प्रवेश केला. या ठिकाणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्यासह दिपक मानकर आणि अन्य नेतेमंडळी उपस्थित होते. मात्र, मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्या किंवा चाकणकर आणि मानकर यांच्या कोणतेही भाष्य झाले नाही.
Devendra Fadanvis : पुणे विचारवंतांचे शहर, इथे निर्णय घेणे अवघड; पुणेकरांना फडणवीसांचे मिश्किल टोले
भाजपचे नेते बाहेर तर, मेधा कुलकर्णी मंडपात
दुसरीकडे, कार्यक्रमस्थळी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते. मेधा कुलकर्णी यांच्या नाराजीबाबत चंद्रकांतदादा आणि मोहोळ यांना प्रश्न विचारण्यात आला. पण दोन्ही नेत्यांनी या विषयावर भाष्य करणे टाळले. मोहोळ आणि चंद्रकांतदादा पाटील हे दोन्ही नेते बाहेरच्या बाजूला आणि मेधा कुलकर्णी मंडपात असल्याने भाजपमधील नेत्यांमध्ये सर्वकाही आलबेल आहे असे नक्कीच नसल्याचे अधोरेखित होते.
मेधा कुलकर्णींची फेसबुक पोस्ट काय?
मेधा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पोस्टला त्यांनी ” असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे ” असे शिर्षक दिले आहे. यात त्या म्हणतात की, माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी.
https://letsupp.com/pune/nitin-gadkari-inaugurated-chandni-chowk-nilam-gorhe-said-centran-government-watch-on-pune-not-womens-77486.html
चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले. चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय Nitin Gadkari जी आणि Devendra Fadnavis यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, “तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला”.
अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते.. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का?
शिंदेंची नाराजी, CM पदावर डोळा अन् 40 रूपयांच्या टाळ्या; अजितदादांनी गाजवला चांदणी चौक
मध्यंतरी आदरणीय मोदी जी, आदरणीय अमित शाह जी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’ चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूड च्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणी मध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे. गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत. देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत.
माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे. माझ्याबाबत त्यांना असे करणे सोपे जाते. कारण माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे.
एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे असे म्हणत मेधा कुलकर्णी यांनी चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पणापूर्वी तोफ डागली होती.