फक्त रासायनिक उद्योगच नाही, केमिकल इंजिनिअरिंगमध्ये करिअरच्या अमर्याद संधी!
chemical engineering आपल्या दैनंदिन वापरातील असंख्य वस्तूंच्या निर्मितीमध्ये केमिकल इंजिनिअरचे महत्त्वपूर्ण योगदान असते
chemical engineering limitless career opportunities not just chemical industry : केमिकल इंजिनिअरिंग ही जीवनाशी सर्वाधिक निगडित असलेली अभियांत्रिकी शाखा आहे. आपल्या दैनंदिन वापरातील असंख्य वस्तूंच्या निर्मितीमध्ये केमिकल इंजिनिअरचे महत्त्वपूर्ण योगदान असते. म्हणूनच ही शाखा विद्यार्थ्यांसाठी रोजगार, उच्च शिक्षण, संशोधन, उद्योजकता आणि परदेशातील करिअरच्या दृष्टीने अत्यंत आशादायी मानली जाते.
ट्रोलियम, रिफायनरी, पेट्रोकेमिकल्स, पॉलिमर, प्लास्टिक, फार्मास्युटिकल्स, जैवतंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया, खते, कीटकनाशके, ऊर्जा, पर्यावरण, मटेरियल सायन्स, वसत्रोद्योग, कागद, रबर, रंग, सौंदर्यप्रसाधने आणि सिमेंट अशा अनेक उद्योगांमध्ये केमिकल इंजिनिअरिंगचे महत्त्व आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील औषधे, साबण, डिटर्जंट, टूथपेस्ट, खाद्यतेल, साखर, पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, अल्कोहोल, पेंट्स, प्लास्टिकच्या वस्तू, फायबर, कागद, सौंदर्यप्रसाधने, खते आणि विविध रासायनिक उत्पादने तयार करण्यामागे केमिकल इंजिनिअर्सचे ज्ञान आणि कौशल्य कार्यरत असते. उद्योगांमध्ये व्यापक रोजगारसंधी केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्या्थ्यांना विविध उद्योगांमध्ये काम करण्याची संधी मिळते. केमिकल इंजिनिअर केवळ रासायनिक उद्योगातच काम करतो, हा समज चुकीचा आहे. प्रत्यक्षात त्याच्यासाठी पुढील क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असतात
उद्योगांमध्ये व्यापक रोजगारसंधी :
केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्याथ्यांना विविध उद्योगांमध्ये काम करण्याची संधी मिळते. केमिकल इंजिनिअर केवळ रासायनिक उद्योगातच काम करतो, हा समज चुकीचा आहे. प्रत्यक्षात त्याच्यासाठी पुढील क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असतात.
• पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू उद्योग
• तेलशुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प
• औषधनिर्मिती आणि जैवतंत्रज्ञान
• पॉलिमर, प्लास्टिक आणि रबर उद्योग
• खते आणि कीटकनाशके निर्मिती
• अन्नप्रक्रिया आणि दुग्धप्रक्रिया उद्योग
• रंग, पेंट्स आणि सौंदर्यप्रसाधने
• साखर, कागद, सिमेंट आणि वस्त्रोद्योग
• पाणी आणि सांडपाणी प्रक्रिया
• ऊर्जा निर्मिती आणि पर्यावरण संरक्षण
• संशोधन आणि विकास संस्था
प्रक्रिया उपकरणांची रचना आणि निर्मिती
रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, ओएनजीसी, गेल, आरसीएफ, एशियन पेंट्स, थर्मॅक्स, टाटा केमिकल्स, सिप्ला, सन फार्मा, डॉ. रेड्डीज आणि इतर अनेक राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये केमिकल इंजिनिअर्सना उत्तम संधी मिळतात.
केमिकल इंजिनिअरचे काम केवळ रसायन तयार करण्यापुरते मर्यादित नसते. प्रयोगशाळेत विकसित केलेल्या प्रक्रियेचे मोठ्या औद्योगिक स्तरावर रूपांतर करणे, उत्पादनाचा खर्च कमी करणे, गुणवत्तेत सुधारणा करणे, ऊर्जेची बचत करणे आणि प्रक्रिया सुरक्षित व पर्यावरणपूरक बनविणे ही त्याची प्रमुख जबाबदारी असते.
एक अधिकारी, एक सरकारी गाडी; अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने नवीन कार्यालयीन ज्ञापन जारी
देश-विदेशात वाढती मागणी भारतात औद्योगिकीकरणाचा वेग वाढत असल्यामुळे केमिकल इंजिनिअसची मागणी सातत्याने वाढत आहे. पेट्रोलियम, फार्मास्युटिकल्स, ऊर्जा, अन्नप्रक्रिया, पर्यावरण आणि विशेष रसायन उद्योगांच्या विस्तारामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. भारताबरोबरच अमेरिका, युरोप, UAE, Middle East Countries, मध्यपूर्व, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि इतर विकसित देशांमध्येही केमिकल इंजिनिअर्सना मोठी मागणी आहे. तेलउत्पादक देशांमध्ये रिफायनरी, पेट्रोकेमिकल आणि नैसर्गिक वायू उद्योगात आकर्षक वेतनासह रोजगार उपलब्ध होतो.
संशोधन आणि नवतंत्रज्ञान
आज जगासमोर ऊर्जा संकट, हवामान बदल, प्रदूषण, पाणीटंचाई, अन्नसुरक्षा आणि कचरा व्यवस्थापन यांसारखी गंभीर आव्हाने आहेत. या समस्यांवर प्रभावी उपाय शोधण्यात केमिकल इंजिनिअरिंगची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.हरित हायड्रोजन, जैवइंधन, बायोडिझेल, इथेनॉल, सौरऊर्जा, बॅटरी तंत्रज्ञान, कार्बन कॅप्चर, कचऱ्यापासून ऊर्जा, पाणी पुनर्वापर आणि पर्यावरणपूरक उत्पादन प्रक्रिया या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. नॅनोतंत्रज्ञान, बायोकेमिकल इंजिनिअरिंग, बायोमेडिकल तंत्रज्ञान, औषध वितरण प्रणाली, आधुनिक मटेरियल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा औद्योगिक प्रक्रियांमध्ये वापर यांमुळे या शाखेला भविष्यकाळात आणखी महत्त्व प्राप्त होणार आहे.
कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त शाखा
भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे केमिकल इंजिनिअरिंगचा कृषी विकासाशीही जवळचा संबंध आहे. खते, जैवखते, कीटकनाशके, अन्नप्रक्रिया, शीतसाखळी, शेतीमालाचे मूल्यवर्धन आणि कृषी-आधारित उद्योगांमध्ये केमिकल इंजिनिअर्सची भूमिका मोठी आहे. शेतमालापासून इथेनॉल, जैवइंधन, स्टार्च, सेंद्रिय उत्पादने आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ तयार करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत होऊ शकते. ग्रामीण भागात लघुउद्योग आणि कृषी-आधारित उद्योग उभारण्यासाठीही या शाखेचे ज्ञान उपयोगी ठरते. उच्च शिक्षण आणि स्वयंरोजगार पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोकेमिकल्स, पॉलिमर, पर्यावरण, ऊर्जा, जैवतंत्रज्ञान, मटेरियल सायन्स, औद्योगिक सुरक्षा आणि प्रक्रिया रचना या क्षेत्रांमध्ये एम.टेक., एम.ई., एम.एस. किंवा पीएच.डी. करू शकतात.
निसर्गाच्या सान्निध्यात रंगणार मराठी कलाकारांची ‘झिम्माड’ पावसाळी पिकनिक
आयआयटी, आबसीटी, एनआयटी, आयआयएससी, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आणि विविध संशोधन संस्थांमध्ये उच्च शिक्षण व संशोधनाच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत.या शाखेत स्वयंरोजगाराच्याही मोठ्या संधी आहेत. साबण, डिटर्जंट, फिनाइल, सौंदर्यप्रसाधने, पाणीशुद्धीकरण रसायने, खाद्यप्रक्रिया उत्पादने, जैवखते, रंग, क्लिनिंग उत्पादने आणि विविध लघुरासायनिक उद्योग सुरू करता येतात.
उज्ज्वल भविष्याची शाखा उद्योग, ऊर्जा, आरोग्य, शेती, पर्यावरण आणि दैनंदिन जीवनातील उत्पादनांची गरज जोपर्यंत आहे, तोपर्यंत केमिकल इंजिनिअर्सची मागणी कायम राहणार आहे. नवतंत्रज्ञान, शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक उत्पादन प्रक्रियांमुळे या शाखेचे महत्त्व भविष्यकाळात अधिक वाढणार आहे. विज्ञान आणि गणिताची आवड, संशोधनाची वृत्ती, समस्यांचे विश्वेषण करण्याची क्षमता, कल्पकता आणि उद्योगक्षेत्रात काम करण्याची तयारी असलेल्या विद्याथ्यांसाठी केमिकल इंजिनिअरिंग ही अमर्याद संधी देणारी सदाहरित आणि भविष्याभिमुख शाखा आहे.
केमिकल इंजिनिअर्स पुढील पदांवर कार्य करू शकतात :
• प्रोसेस इंजिनिअर
• प्रॉडक्शन इंजिनिअर
• प्रोजेक्ट इंजिनिअर
• डिझाइन इंजिनिअर
• सेफ्टी इंजिनिअर
• एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअर
• ऑपरेशन आणि मेंटेनन्स इंजिनिअर
लेखक : डॉ. के. टी. जाधव (डी. वाय. पाटील एज्युकेशनल कॉम्प्लेक्स), आकुर्डी, पुणे