पाणी फाउंडेशनध्ये चिंचोलीतील महिलांच्या शेतकरी गटाचा डंका; प्रथम स्थान पटकावल, मुख्यमंत्र्यांकडून सन्मन

पाणी फाउंडेशनध्ये चिंचोलीतील महिलांच्या शेतकरी गटाचा डंका; प्रथम स्थान पटकावल, मुख्यमंत्र्यांकडून सन्मन

Water Foundation Award 2025 : सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेमध्ये पाणी फाउंडेशनच्या महिला गटातून चिंचोली येथील अन्नदाता शेतकरी महिला गटाने राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, महालकिनोळा येथील जय मल्हार महिला शेतकरी गटानेही राज्यातून द्वितीय क्रमांक पटकावून वर्चस्व सिद्ध केले आहे. (Water Foundation) त्यामुळे चिंचोलीच्या महिला शेतकरी गटाला पाच लाख रुपये तर महाल किनोळा महिला शेतकरी गटाला तीन लाख रुपयाचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता आमिर खानच्या हस्ते देण्यात आला आहे.

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून मागील गेल्या काही वर्षापासून सुरुवातीला पाण्याचा स्त्रोत वाढविण्यासाठी भर देण्यात आला. त्यानंतर आता फार्मर कप स्पर्धा पाणी फाउंडेशन राज्यभर आयोजित करीत आहे. या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून 46 तालुक्यातील सुमारे 25 हजार गट या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यातील चांगले काम करणाऱ्या 4 हजार गटाचे मूल्यांकन करण्यात आले होते. पाणी फाउंडेशनने महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी संपूर्ण राज्यातून उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन गटाची निवड केली जाते. येथील बालेवाडी स्टेडियमवर पार पडला.

कांदा उत्पादकांसाठी गुडन्यूज! सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवला, केंद्राचा महत्वाचा निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्य उपस्थिती होती. यावेळी राजकीय, सिनेसृष्टी, उद्योग जगतातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कला आणि उद्योग क्षेत्रातील या मान्यवरांच्या हस्ते विजेता गटांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या स्पर्धेसाठी राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार 25 लाख, द्वितीय पुरस्कार 15 लाख, तृतीय पुरस्कार 10 लाख रुपये व सन्मान चिन्ह होते. त्याचबरोबर खास महिलांसाठी सर्वोत्कृष्ट महिला गट म्हणून देखील राज्यस्तरीय तीन पुरस्कार ठेवण्यात आले होते. यात प्रथम पुरस्कार पाच लाख, द्वितीय पुरस्कार तीन लाख तर तृतीय पुरस्कार दोन लाख रुपये व सन्मान चिन्ह होते.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील चिंचोली येथील अन्नदाता महिला शेतकरी गट या गटाने सर्वोत्कृष्ट महिला गटाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळवला आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट महिला गटाचा द्वितीय पुरस्कार महाल किनोळा येथील जय मल्हार महिला शेतकरी गटाने मिळविला. त्यामुळे या विजेत्या महिला गटांना अनुक्रमे पाच लाख व तीन लाख रुपयाचे पत्र व स्मृतिचिन्ह मिळाले आहे. त्यामुळे या दोन्ही गटाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. या गटाला नेहमी फाउंडेशनचे विभागाचे विभागीय समन्वयक प्रल्हाद आरसूळ, तालुका समन्वयक अस्लम बेग यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या