केवळ प्रयोगशाळेत संशोधन करून थांबू नका; गीतेंच्या मार्गदर्शनाने आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र परिषदेचा समारोप

International Physics Conference च्या समारोपप्रसंगी तौरलइंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गीते यांनी मार्गदर्शन केले.

International Physics Conference

Concluding the International Physics Conference under the guidance of Bharat Geete in Pune : केवळ प्रयोगशाळेतील चार भिंतींच्या आत संशोधन करून थांबून चालणार नाही. त्या संशोधनाचे रूपांतर प्रत्यक्ष उत्पादनात आणि व्यापारात झाले पाहिजे. देशाला खऱ्या अर्थाने स्वावलंबी आणि विकसित बनवण्यासाठी अकॅडमी आणि इंडस्ट्री’मध्ये थेट संवाद होणे काळाची गरज आहे.

ते भ्रम पसरवण्याचं काम, सुर्य चंद्र असेपर्यंत… मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या टीकेवरून शेलारांचा पलटवार

असे प्रतिपादन पुण्याच्या तौरल इंडियाइंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि भारताचे ‘अॅल्युमिनियम मॅन‘ भरत गीते यांनी केले.कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. राजेंद्र सोनकवडे होते.

Video : पुणे मुंढवा भूखंड गैरव्यवहारात पार्थ पवारांचा सहभाग, विजय कुंभार यांनी दिला मोठा पुरावा

भारताला अॅल्युमिनियम कास्टिंग आणि फॅब्रिकेशन क्षेत्रात जागतिक स्तरावर नेऊन ठेवणाऱ्या गीते यांनी विद्यार्थ्यांनी संशोधनाचे रूपांतर उद्योगात कसे करावे, याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘लॅब टू फॅब्रिकेशन‘ मंत्र दिला. केवळ पेटंट मिळवून न थांबता त्याचे व्यापारीकरण कसे करावे आणि यशस्वी स्टार्टअप्स कसे उभे करावेत, याचे व्यावहारिक धडे त्यांनी दिले.

अमेरिका लैंगिक छळ प्रकरणात भारतातील तीन आजी-माजी खासदारांची नावं, पृथ्वीराज चव्हाणांचा नवा गौप्यस्फोट

आयर्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ लिमरिकचे डॉ. नानासाहेब थोरात, समन्वयक डॉ. नीलेश तरवाळ आदी उपस्थित होते. डॉ. राजीव व्हटकर, आण्णासाहेब मोहोळकर, केशव राजपुरे, मानसिंग टाकळे, एस. पी. दास, एम. आर. वाईकर, ए. आर. पाटील यांनी परिषदेचे संयोजन केले. डॉ. सत्यजित पाटील यांनी आभार मानले. दरम्यान, परिषदेच्या सकाळच्या सत्रात दक्षिण अमेरिकेतील चिली येथील डॉ. संतोष नंदी यांनी नॅनो स्ट्रक्चर्समधील अद्ययावत बदलांची माहिती दिली.

follow us