सदर्न स्टार आर्मी वुमन्स वेल्फेअर असोसिएशनच्या अस्मिता-दक्षिणी कथानक 2025 मध्ये दिसलं सैनिकांच्या पत्नींचं धैर्य

Asmita-Dakshini storyline 2025 हा सदर्न स्टार आर्मी वुमेन्स वेलफेअर एसोशिएशनचा कार्यक्रम सैनिकांच्या पत्नींसाठीचं व्यासपीठ आहे.

Asmita Dakshini Storyline 2025

Courage of soldiers’ wive seen in the Southern Star Army Women’s Welfare Association’s Asmita-Dakshini storyline 2025 : पुण्यामध्ये भारतीय सैन्याचा ग्रुप असलेल्या सदर्न स्टार आर्मी वुमेन्स वेलफेअर एसोशिएशनचा कार्यक्रम पार पडला. या ग्रुपचा अस्मिता-दक्षिणी कथानक 2025 हा कार्यक्रम दरवर्षी घेतला जातो. हे भारतीय सैन्यातील सैनिकांच्या पत्नींचे धैर्य, कामगिरी, जिद्द आणि चिकाटी दर्शवणारे व्यासपीठ आहे.

सुप्रिया सुळे यांना राणा पाटलांचे थेट उत्तर… चर्चेसाठी बोलवा, पुरावेच दाखवतो

या वर्षी अस्मिता-दक्षिणी कथानक 2025 या कार्यक्रमामध्ये आठ भारतीय सैन्यातील सैनिकांच्या पत्नींनी त्यांचे अनुभव शेअर केले. यामध्ये त्यांनी वारंवार होणाऱ्या बदल्या त्यामुळे त्या भागात किंवा शहरात त्यांना रूळायला लागणारा वेळ आणि आव्हानं सांगितले. तसेच कुटुंबापासून दूर पतीशिवाय घर सांभाळणे, मुलांचं संगोपण करणे, कठिण परिस्थितीमध्ये दाखवावं लागणारं धैर्य हे सर्व या महिलांनी त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या कथांमध्ये होतं.

बाळराजे राजकारणात लहान, मी अजितदादांची माफी मागतो, राजन पाटलांकडून दिलगिरी व्यक्त

या कार्यक्रमासाठी पद्मश्री आणि खेलरत्न पुरस्काराने सन्मानित पॅरा-अथलिट डॉ. दीपा मलिक आणि मित्ती कॅफेची संस्थापक अलीना आलम या दोघी जणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांनी या कार्यक्रमामध्ये आणखी प्रभाव पाडला. तर यावेळी बोलताना या संस्थेचे विभागीय अध्यक्ष कोमल सेठ यांनी सांगितलं की, हा केवळ एक कार्यक्रम नाही तर आत्मविश्वास आणि सामाजिक समर्थन देणारं आंदोलन आहे.

follow us