Video : ”मी, शिंदे अन् अजितदादा शिवरायांचे मावळे; जिथं कमी पडेल तिथं सगळे मदत करू”

Devendra Fadanvis announces 50 core for Shivsrushti : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पुण्यात शिवसृष्टीच्या द्वितीय चरणाचे लोकार्पण पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने शिवसृष्टीला आम्ही 50 कोटीरुपये देण्याची घोषणा केली. तसेच यावेळी त्यांनी मी आणि माझे दोन्ही उपमुख्यमंत्री मावळे आहेत , जिथं कमी पडेल तिथं सगळे मदत करू असं अश्वासन दिलं
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे महाराजांना खूप मानतात आणि पुण्याचे काम असले की, अजित पवार तर कधीच नाही म्हणत नाहीत म्हणून जिथे जिथे कमी पडेल तिथे सरकार आपल्या पाठीशी आहे. शिवसृष्टी ही आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. तर या कार्यक्रमानंतर आग्र्याच्या किल्ल्यावर महाराजांना कैदी करण्याचा मूर्खासारखा प्रकार औरंगजेबाने केला होता. आज तिथं शिवजयंती साजरी करणार आहोत.
सुरक्षित आणि समृद्ध शिर्डीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहू ; डॉ. सुजय विखे पाटील
तसेच ही शिवसृष्टी बघून मी निःशब्द झालो आहे. असं म्हणत त्यांनी शिवसृष्टीच्या निर्मात्यांचं कौतुक केलं. ते म्हणाले मी जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी गेलो सगळं पाहिलं पण जी प्रेरणा आणि भावना या थेटर मध्ये तयार झाली ती अप्रतिम आहे. महाराष्ट्र सह देशातील प्रत्येक विद्यार्थी इथे आलाच पाहिजे त्याला योग्य पद्धतीने आपला इतिहास कळेल. खरंतर या विद्यार्थ्यांना अधिच खरा इतिहास सांगितला पाहिजे होता पण दुर्दैवाने तो सांगितला गेला नाही.
अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना दिलासा! 12 तूर खरेदी केंद्रांना मंजुरी, 9 केंद्रांवर नोंदणी व खरेदी सुरू
विद्यार्थी इथं आले तर सगळा खरा इतिहास त्यांना कळेल. जाने शिवसृष्टी बघितली नाही त्याने जीवनातला एक वेगळा आनंद मिस केला आहे. आम्ही याला मेगा पर्यटनाचा दर्जा दिला असला तरी हे पर्यटन स्थळ नाही लोकांनी अभ्यास करण्यासाठी इथ यावं. महाराज योगी होते आणि या खऱ्या योग्याचेमंदिर म्हणजे ही शिवसृष्टी.
मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिला. शिवराय लढवय्या तर होतेच जगातले एक उत्तम योद्धे आणि उत्तम प्रशासक होते. ज्या प्रकारची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती त्यांच्या राज्या मध्ये होती , महिलांना योग्य न्याय आणि जातीवरून कोणावरही अन्याय होत नव्हता अन्याय करेल त्याला शिक्षा होणारच हा कायदा महाराजांनी बनवला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राज्यातील बारा किल्ले युनेस्को साठी नॉमिनेट केले आहेत. छत्रपती शिवरायांचे किल्ले जागतिक वारसा म्हणून युनेस्को स्वीकारेल ही खात्री आहे. आपल्याला इथ स्वराज्याची राजधानी पाहता येणार आहे. महाराजांनी वृक्ष संवर्धन आणि जलसंवर्धन देखील आपल्याला शिकवलं. महाराज पर्यावरण प्रेमी देखील होते. असं यावेळी फडणवीस म्हणाले.