धनगर समाजाला कधी मिळणार आरक्षण ? पडळकरांनी सांगितली डेडलाईन

  • Written By: Published:
धनगर समाजाला कधी मिळणार आरक्षण ? पडळकरांनी सांगितली डेडलाईन

इंदापूर : सध्याचे सरकार धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पूर्णपणे सकारात्मक असून डिसेंबर महिन्याच्या अखेरीस धनगर समाजाला आरक्षण मिळेल असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांनी व्यक्त केला. पडळकरांनी सध्या धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation) महाराष्ट्रभर धनगर जागर यात्रेचे आयोजन केले असून इंदापूर येथे धनगर जागर यात्रेच्या सभेत ते बोलत होते. उच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणीच्या अंतिम तीन सुनावण्या बाकी असून लवकरच त्या पूर्ण होऊन धनगर समाजाला आरक्षण मिळेल असे पडळकर म्हणाले.

वडेट्टीवार अन् पटोलेंचे पुन्हा दक्षिण-उत्तर! ओबीसी प्रश्नावरुन दोघांच्या दोन स्वतंत्र बैठका

धनगर समाजाला बिरोबा, बाळूमामा, अहिल्यादेवींच्या आशीर्वादाने गेल्या ७० वर्षांची मागणी या सरकारच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. प्रस्थापित समाजाला धनगरांची ताकत समजावी म्हणून या यात्रेचे आयोजन केले गेले असून धनगर जागर यात्रेच्या माध्यमातून सरकारला आपण धनगर समाजाची एकजूट दाखवून दिली आहे. असे पडळकर म्हणाले.


मैं निकला गड्डी लेके… आमदार लंकेंच्या हातात स्टेअरिंग अन् अजितदादा साथीला…

बारामतीच्या साहेब, ताई, दादा यांच्या गुलामगिरीतून बाहेर पडावे लागेल असे म्हणत त्यांनी पवार कुटुंबियांवर नाव ना घेता बोचरी टीका केली. सत्तेत असलेल्या अजित पवारांना देखील पडळकरांनी घरचा आहेर देत टीका केली. धनगर समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात मोठी असून आमदारांची संख्या मात्र अल्प आहे. समाज एकत्र आला तर सरकार उलथवून टाकण्याची टाकत आपल्या समाजात आहे, या यात्रेला सुरुवात होताच ‘लांडग्यांची पिलावळ’ ओरडायला लागली. सत्ताधारी आणि विरोधक दोघानाही आपली टाकत माहीत आहे. धनगर समाज जेव्हा एकत्र येतो तेव्हा तो सरकारची झोप उडवतो. असेही ते म्हणाले. धनगर समाजाचे नेते बी. के कोपरे यांचा उल्लेख करून पडळकर यांनी त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.

प्रस्थापितांनी धनगर समाजाच्या जागा लाटल्या असून त्या आता माघारी घेण्याची वेळ आली आहे, शरद पवार यांनी एनटी आरक्षण न देता एसटी प्रवर्गात आरक्षण दिले असते तर ही धनगर जागर यात्रा काढण्याची वेळ आली नसती. असेही ते म्हणाले. पवार कुटुंबीयांची भूमिका दुटप्पी असून त्यांच्या विरोधात जर लढायचे असेल तर सर्व बहुजन समाजाला एकत्र यावे लागेल. असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. धनगर आरक्षणाची निम्मी लढाई आपण जिंकली असून लवकरच न्यायालयीन लढाई देखील आपण जिंकू असा विश्वास त्यांनी अखेरीस व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube