पुण्यात थंडीमध्ये शेकोटी पेटवू नका, अन्यथा दंड भरा; आयुक्त नवल किशोर राम यांनी असे आदेश का दिले?
Pune महापालिका आयुक्तांनी प्रदुषण अन् हवा गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर शेकोट्या न पेटववण्याचे आदेश दिले आहेत.. अन्यथा दंड केला जाणार आहे.
Do not light fires in Pune during winter, otherwise pay fine Commissioner orders in the backdrop of pollution and air quality : सध्या राज्यामध्ये हिवाळा सुरू झाला असून कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळे नागरिक थंडापासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवत आहेत. मात्र आता पुणे शहरामध्ये जे नागरिक शेकोट्या पेटवतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे. तसे आदेश पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. मात्र त्यांनी असे आदेश का दिले? याबाबत त्यांनी जारी केलेल्या पत्रकामधून जाणून घेऊ…
प्रदुषण अन् हवा गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांचा आदेश…
पुणे शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले तसेच निवासी परिसरांमध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षा कर्मचारी थंडीपासून बचाव करण्यासाठी उघड्यावर शेकोट्या पेटवताना लाकूड, कचरा किंवा कोळसा जाळतात. यामधून निर्माण होणाऱ्या धुरांमुळे पुणे शहरातील हवा प्रदूषण वाढत आहे. हवा प्रदूषणामुळे न केवळ वातावरणामध्ये बदल होतात, तर याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील होतो. शेकोट्या पेटवल्यामुळे धूर, कार्बन मोनोऑक्साइड PM १० PM २.५ आणि अन्य हानिकारक वायूंच उत्सर्जन होऊन श्वसनावर परिणाम होतो, ज्यामुळे दमा, अस्थमा आणि इतर श्वसन रोगांचा धोका वाढत आहे.
पार्थ पवारांना मुंढवा जमीन प्रकरणात “ क्लिन चिट” देणाऱ्या अहवालामध्ये नेमकं काय?
शहरातील हवा गुणवत्तेत सुधारणा करणेसाठी केंद्र तसेच राज्य शासनाने हवा प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी विविध कायदे आणि नियम बनवले आहेत. जसे कि “हवा (प्रदूषण नियंत्रण) अधिनियम, १९८१” अंतर्गत भाग ४ कलम १९ (५), आणि “घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६” कलम १५ (छ) तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांचेकडील राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमची दि. २५/८/२०२२ रोजीची मार्गदर्शक तत्वे यानुसार उघड्यावर कोळसा / जैविक पदार्थ (बायोमास ) / प्लास्टिक / रबर आणि इतर कचरा जाळण्यास मनाई केली आहे.
जर पुणे शहरातील सोसायटीच्या परिसरात किंवा रस्त्यावर शेकोटी पेटवून उघड्यावर कोळसा / जैविक पदार्थ (बायोमास )/ प्लास्टिक / रबर आणि इतर कचरा जाळून धूर निर्माण केला आणि कोणत्याही गृहनिर्माण संकुलातील वॉचमन, सफाई कामगार आणि इतर कामगार व्यक्ती, मनपा कर्मचारी किंवा कंत्राटी कामगार किंवा मनपा ठेकेदाराकडील नियुक्त कंत्राटी कामगार या नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास, त्यांच्यावर पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.
