ललित पाटीलची तब्येत बिघडली; पोटदुखी अन् हर्नियाचा त्रास बळावल्याने पुन्हा ‘ससूनवारी’
पुणे : ड्रग्ज (Drugs) माफिया ललित पाटील (Lalit Patil) याचा पोटदुखी आणि हर्नियाचा त्रास बळावल्याने उपचारासाठी ससून रुग्णालयात आणण्यात आले आहे. मागील 4 दिवसांपासून ललित पाटीलला हा त्रास होत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्याला ससूनमध्ये आणण्यात आले आहे. मात्र त्याला अॅडमिट करणार नसून केवळ उपचार करुन त्याची रवानगी पुन्हा कारागृहात करण्यात येणार आहे. (Drug mafia Lalit Patil is brought to Sassoon Hospital for treatment due to stomach pain and hernia)
ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पुणे पोलिसांनी तीन वर्षापूर्वी अटक केली होती. त्यानंतर तो सातत्याने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत होता. अशात मागील 9 महिन्यांपासून तो सातत्याने ससूनमध्येच अॅडमिट होता. मात्र या काळात 2 ऑक्टोबर रोजी ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.
Pune : जांभुळवाडी दरी पुलावर मोठा अपघात, कंटेनरच्या धडकेत दोघे जागीच ठार, 5 जण गंभीर
पोलिसांच्या सुरक्षेतून आरोपी फरार झाल्याने पोलिसांची मोठी नाचक्की झाली होती. तसेच विरोधकांनीही हे प्रकरण उचलून धरत सरकारवर गंभीर आरोप केले होते.ललित पाटील हा चेन्नईत लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते.
ललित पाटील प्रकरणात ससूनचे डीन संजीव ठाकूर यांना हटवले :
मी ससूनमधून पळालो नाही, तर मला पळवण्यात आलं होतं, असं विधान ललित पाटीलने अटक केल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर केलं होतं. त्यानंतर त्याला पळून जाण्यात कुणाचा हात होता? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. तर, आमदार रविंद्र धंगेकर यांनी थेट आरोप करत पाटीलला पळवून लावण्यात संजीव ठाकूर यांचाच हात असल्याचा खळबळजनक आरोप केला होता.
सिंकदर शेख ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी, शिवराज राक्षेला चीतपट करत पटकावले जेतेपद
त्यानंतर या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या प्रकरणात ते ठाकूर दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने कारवाई करत त्यांना पदमुक्त केले आहे. मात्र डॉक्टरांचे काम रुग्णावर उपचार करणं असतं. पळवून लावण्यात कुठल्या डॉक्टरचा हात असेल असे मला वाटत नाही, असं म्हणत ठाकूर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले होते.