अन् नाना गायकवाडांचे डील दोनशे कोटीत डन; रवींद्र पाटलांचे जालिंदर सुपेकरांवर गंभीर आरोप

Ex IPS Ravindranath Patil on Jalindar Supekar Bribe demand from Nana Gaikwad : रविंद्रनाथ पाटील हे 2004 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी आयपीएस झाले होते. मुळचे मराठवड्यातील असलेले पण पुण्यात स्थायिक झालेले पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्हे उघड केले. मात्र त्यांना 2018 च्या बिटकॉईन फसवणुक प्रकरणात तुरूंगात जावं लागलं. त्यांच्या याच जेलमधील अनुभवांवर त्यांनी ‘तुरूंगरंग’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या याच पुस्तकाच्या निमित्ताने लेट्सअप मराठीने त्यांची विशेष मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर गौप्यस्फोट केले आहेत. यावेळी त्यांना जालिंदर सुपेकर यांच्यावरील गायकवाड पिता-पुत्रांना 500 कोटींची मागणी केल्याच्या आरोपांवर त्यावर विचारले असता. पाटील यांनी IPS जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
नाना गायकवाडांचे डील दोनशे कोटीत डन…
नाना गायकवाड यांना जेलमध्ये त्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी सुपेकरांनी 500 कोटी रूपये मागितले होते. मात्र शेवटी डील 200 कोटींमध्ये डन झाली. त्यांना आरोग्याच्या दृष्टीने जेलच्या कॅन्टीनचे जेवण चालत नव्हतं. त्यांनी तीन वर्ष हे जेवण जेवलं नव्हतं. तसेच ते केवळ ड्रायफ्रुट्स अन् चिक्कीवर राहत होते. त्यानंतर आता त्यांना अमरावती जेलमध्ये हलवण्यात आलं आहे. तर त्यांचं कुटुंब हे राज्याबाहेरील जेलमध्ये आहे. हे बदल देखील पोलिस पैशांसाठीच करतात. असा आरोप देखील पाटील यांनी केला आहे.
पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापूरात एन्काऊंटर; पत्रकार परिषदेत काय म्हणाले पोलीस?
त्याचबरोबर एका कैद्याला येरवड्याहून सांगलीला पाठवलं त्यासाठी एका मकोकाच्या आरोपीने दिड कोटी कॅशमध्ये द्यायचे अशी चर्चा त्यांची सुपेकरांशी चालली होती. त्याचबरोबर राजू शेटींनी आरोप केलेले फराळ अन् कॅन्टीनच्या टेंडरबद्दल सांगायचं झालं तर ते तब्बल दोनशे त अडीचशे कोटींची असतात. तसेच त्यात नाशिक, कोल्हापूर, तळोजा आणि येरवडाची होते.
तसेच मी नाना आणि गणेश गायकवाडांना चांगलं ओळखतो. त्यांना अटक होण्याअगोदर देखील अनेक गोष्टी या पोलिस अधिकाऱ्याकडून मागण्यात आल्या होत्या. त्यांनी ते स्वत: मला सांगितलं आहे. असंही पाटील म्हणाले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण चर्चेत असतानाच आता गायकवाड प्रकरण चर्चेत आलंय. शशांक हगवणे यांचे मामा विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्याकडून गायकवाड पिता-पुत्रांना 500 कोटींची मागणी करण्यात आल्याचा आरोप गायकवाड यांच्या वकिलांकडून करण्यात आला आहे. सुनेच्या छळाप्रकरणी सध्या गायकवाड पिता-पुत्र नाना गायकवाड (Nana Gaikwad) आणि गणेश गायकवाड (Ganesh Gaikawad) तुरुंगात आहेत.
कोण आहेत नाना गायकवाड?
नानासाहेब गायकवाड हे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे सख्खे मावस भाऊ आहेत. नानासाहेब गायकवाड हे सावकार आहेत. त्यांच्याविरोधात अनेक लोकांना तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. नाना गायकवाड यांच्याविरोधात पुण्यात अनेक तक्रारी दाखल झाल्याने त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर नाना गायकवाडसह गणेश गायकवाडवर पोलिसांनी तीन मकोका कारवाई केलेली आहे.यासोबतच येरवडा कारागृहात असताना इतर कैद्यांकडून त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे गायकवाड पिता-पुत्रांना अमरावती कारागृहात हलवण्यात आले.