…म्हणून अतिवृष्टी होताच पुण्यात पूर; माजी आमदार विजय काळेंनी सांगितली कारणं
EX MLA Vijay Kale on Heavy Rain and Flood conditions Pune : गेल्या दोन दिवसांत पुण्यात (Pune Rain) होत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक रेकॉर्ड तोडले आहे. शहरातील अनेक भागात पाणी शिरले होते. त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. आतापर्यंत पुण्यात मुसळधार पावसामुळे पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अतिवृष्टी झाली की पुणं का बुडतं? याची विविध कारण माजी आमदार विजय काळे (EX MLA Vijay Kale) यांनी सांगितले आहेत. काय आहेत ही कारणं जाणून घेऊ…
Farah Khan : फराह खानवर कोसळला दु:खाचा डोंगर, आईच्या मायेचे छत्र हरपले
पुण्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीवर बोलताना काळे म्हणाले की, पुण्यामध्ये पूरस्थिती अगोदर देखील निर्माण होत होती. मात्र ही स्थिती जर पाण्याचा धरणातून होणारा विसर्ग हा 60 हजार क्युसेक किंवा त्यावर असेल तरच येत होती. मात्र आता 35-40 हजार क्युसेक पाणी सोडल्यानेच शहर पाण्याखाली जात आहे.
अहमदनगरमध्ये ACB ची मोठी कारवाई, महिला मंडलाधिकारी,तलाठी लाचेच्या जाळ्यात
नद्यांमध्ये गाळ, प्रवाह बुजविले !
याची कारण म्हणजे पाण्याच्या प्रवाहाला वेग राहिलेला नाही. नद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात गाळ साठला आहे. त्यामुळे पाणी वाहून न जाता आसपासच्या परिसरात शिरते. नैसर्गिक पाण्याचा निचरा होणारी झरे आणि प्रवाह बुजवण्यात आली आहेत. रस्त्यांचं तसेच नुकतेच सुरू असलेल्या मेट्रोचे काम यामुळे मातीचे ढीग बांधकामाचे साहित्यामुळे पाण्याला वाहण्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पावसाचे पाणी त्याचबरोबर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याला वेगाने वाहून जाण्यासाठी निर्माण होणारे अडथळे दूर करणे प्रशासनाचे काम आहे.
ऑलिम्पिकपूर्वी फ्रान्समध्ये हायस्पीड रेल्वे मार्गावर हल्ला, 8 लाख लोक स्टेशनवर अडकले
त्याचबरोबर यावेळी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबद्दल प्रशासनाकडून नागरिकांना कोणतीही पूर्वकल्पाना देण्यात आली नव्हती. त्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी वेळेत पोहचता आले नाही. त्यामुळे लोकांच्या घरात अचानक पाणी शिरले आणि त्यांची अडचण झाली. संसारउपयोगी साहित्य वाहून गेले. त्यांचे हाल होत आहेत. असं देखील काळे म्हणाले.