Video : सदाभाऊ खोत यांनी पुणे महापालिकेसमोर विकले कांदे, भावही ठरवला
पुणे : महापालिकेच्या (Pune Municipal) अतिक्रमण विभागाने रस्त्यावर कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा टेम्पो जप्त करून त्याला तब्बल ४० हजार रूपयांचा दंड लावला आहे. तर गेल्या ८ दिवसांपासून महापालिका या टेम्पो चालकाला गाडी सोडविण्यासाठी हेलपाटे मारायला लावत आहे. त्याच्या निषेधार्थ माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot ) यांनी सोमवारी महापालिकेच्या पालिकेच्या गेटवर चढले आहेत.
Pune Politics: सदाभाऊ खोत यांनी पुणे महापालिकेसमोर विकले कांदे, भावही ठरवला#PunePolitics #SadabhauKhot #PMC #MunicipalEncroachmentDepartment @sadabhaukhot @PMC #letsuppmarathi pic.twitter.com/P2DJGz3ibn
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) April 17, 2023
अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पालिका प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. तसेच सदर शेतकऱ्यावरती कोणतीही कारवाई न करता त्याच्या शेतीमाल कांदा व शेतमाल वाहतूक वाहन त्वरित सोडून देण्यात यावे व कोणतेही कारवाई न करता कोणताही दंड आकारण्यात येऊ नये.
आज आम्ही सदर शेतकऱ्यावर ती झालेल्या अन्याला वाचा फोडण्यासाठी व यापुढे कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय महानगरपालिकेकडून होऊ नये, याकरिता रयत क्रांती संघटना, जनसागर सरपंच असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार वाडा ते पुणे महानगरपालिका पर्यंत लक्षवेधी आंदोलन करत आहेत. अश्या कार्यवाही न थांबल्यास राज्यभर शेतकरी आणि रयत क्रांती संघटना यांच्यातर्फे अन्यायका्रक कायद्यांच्या विरोधात कायदेभंग व असहकार आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
त्यामुळे, महापालिका प्रशासनाने तातडीने ही कारवाई करणाऱ्या तसेच गाडी सोडण्यासाठी शेतकऱ्याची अडवणूक करणाऱ्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली. यावेळी खोत यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांनी कांदे विकले. महापालिकेसमोर झालेले हे अचानक आंदोलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.