Kasba By Election : ‘आजारी असले तरी गिरीश बापट मतदानासाठी येणार…

Kasba By Election : ‘आजारी असले तरी गिरीश बापट मतदानासाठी येणार…

पुणे : आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांना प्रचारात उतरवल्यानं भाजपवर (BJP ) टीकेची झोड उठली आहे. पुण्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचारानं वेग थांबला असून सर्वच प्रमुख पक्षांनी आपापल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी झोकून दिलं होत. (Maharashtra Mp) कसबा पेठ निवडणुकीत भाजपनं दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील कोणालाही तिकीट न दिल्यानं मतदारसंघात काहीशी नाराजी आहे. त्यामुळं सावध झालेल्या भाजपनं आजारी खासदार गिरीश बापट यांना प्रचाराच्या मैदानात उतरवलं होत. (MP Girish Bapat) मात्र, त्यामुळं भाजपवर विरोधकांसह सामान्य जनतेनंही टीकेचा भडिमार केला.

या आधी भाजपच्या पक्षासाठी महापालिकेतील कामाचा धडाका पाहून पक्षानं २०१९ साली त्यांना पहिल्यांदा विधानसभेत मुक्ता टिळक यांना जाण्याची संधी मिळाली. कसबा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला व विधानसभेत प्रवेश केला. परंतु भाजपनं आजारी खासदार गिरीश बापट यांना प्रचाराच्या मैदानात उतरवलं, तरी उद्या सकाळी (२६ फेब्रुवारी) रोजी खासदार गिरीशजी बापट हे सकाळी ११ ते ११ :३० च्या दरम्यान अहिल्यादेवी शाळा, (मोतीबाग समोर) मतदान करणार आहेत.

कसबा पेठेची जागा राखण्यासाठी मोठं आव्हान सध्या भाजप पक्षासमोर आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळावी, अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा होती. मात्र, पक्षानं नवीन चेहरा दिला. त्यामुळं टिळक समर्थक तसंच ब्राह्मण समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्यात हिंदू महासंघानंही इथून उमेदवार उतरवला आहे. यामुळे मतविभागणीचाही धोका आहे. हे टाळण्यासाठी भाजपनं या मतदारसंघाचं विधानसभेत अनेक वर्षे प्रतिनिधित्व करणारे सध्याचे खासदार गिरीश बापट यांना प्रचारात उतरवलं होत.

 

कोण आहेत गिरीश बापट?

गिरीश बापट यांचा (Who Is Girish Bapat) जन्म ३ सप्टेंबर १९५० रोजी पुण्यात झाला. तळेगाव दाभाडेमधून प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत झाले. बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर बापट १९७३ मध्ये टेल्कोमध्ये कामगार म्हणून रुजू झाले. त्यानंतर २ वर्षांतच आणीबाणीमध्ये १९ महिन्यांचा कारावास नाशिक जेलमध्ये त्यांनी भोगला होता.

IND W vs AUS W T20 : भारतासाठी आज ‘करो या मरो’ सामना

गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास

आणीबाणीच्या काळात तुरुंगात शिक्षा भोगून आल्यावर गिरीश बापट यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील अनेक पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. १९८३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. सलग ३ टर्म त्यांनी नगरसेवकपद राखले. या काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसताना देखील स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते.

१९९५ मध्ये आमदारकीची निवडणूक लढविली अन्‌ पुढे सलग २०१४ पर्यंत ते ५ वेळा निवडून आले होते. १९९६ साली त्यांना भाजपाने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. पण बापट यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार झाले. २०१४ मध्ये गिरीश बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र, पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिल्याने त्यांची संधी हुकली. परंतु, २०१९ मध्ये योग्यपणे मोर्चेबांधणी करत त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळवले होते. यानंतर निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल ९६ हजार मतांनी पराभव केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube