नसरापूर प्रकरणी नागरीकांचा संताप थांबेना, सरकारने घेतला मोठा निर्णय

नसरापूर घटनेचा तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार करण्यात आली आहे.

News Photo   2026 05 03T180331.356

नसरापूर येथे एका 65 वर्षांच्या (Nasrapur) नराधमाने चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली. या घटनेवरून लोकांमध्ये संताप वाढला असून नराधमाला फाशी द्या अशी मागणी होत असताना सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटी करणार आहे.

नसरापूर घटनेचा तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार करण्यात आली आहे. नसरापूरच्या घटनेनंतर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला आहे. नसरापूरमधील नागरिकांनी शनिवारी पुण्यातील नवले पूर बंद केला होता. त्यानंतर लोकभावना लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करण्यासाठी सरकारकडून हालचाल केली जात आहे.

follow us