Chinchwad By Election : …तर धंगेकरांसारखा विजय दिसला असता, राहुल कलाटेंचं स्पष्टीकरण

Chinchwad By Election : …तर धंगेकरांसारखा विजय दिसला असता, राहुल कलाटेंचं स्पष्टीकरण

पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकेड एक सक्षम पर्याय म्हणून मीच होतो, मी महाविकास आघाडीचा उमेदवार असतो तर धंगेकरांसारखा विजय दिसला असता, असं स्पष्टीकरण राहुल कलाटे यांनी दिलं आहे.

कलाटे म्हणाले, महाविकास आघाडीमधील मोठ्या नेत्यांबद्दल मी बोलणार नाही पण, चिंचवड पोटनिवडणुकीत चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे मीच पर्याय होतो. मी महाविकास आघाडीचा उमेदवार असतो तर रविंद्र धंगेकरांसारखा विजय दिसला असता.

शाळकरी विद्यार्थ्यांबाबत मोठा निर्णय.., दफ्तराचे ओझे कमी होणार

चिंचवड पोटनिवडणुकीत कोणाची चूक झाली, कोणाकडून झाली हे आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच विचारावं लागणार आहे. मी आधीही दोनदा निवडणूक लढविली होती. ज्यावेळी परिस्थिती अवघड होती तेव्हाही आणि आता अनूकूल होती तरीही लढवली आहे. तरीही मला या निवडणूकीत डावलल्याची खंत राहुल कलाटेंनी व्यक्त केलीय.

जनादेशाचा स्वीकार करत फडणवीस म्हणाले, आम्ही पुन्हा येऊ!

ही निवडणूक चेहरा आणि विकासाच्या मुद्द्यावर होईल, असं वाटतं होतं, मात्र ही निवडणूक भावना आणि प्रतिष्ठेची झाली आहे. नवनिवर्चित आमदारांना शुभेच्छा आणि माझ्यासाठी कष्ट घेतलेल्या कार्यकर्त्यांचा मी आभारी असल्याचंही त्यांनी यावेळी म्हंटलयं.

दरम्यान, आता पुढील काही दिवसांनंतरच पुन्हा 2024 ची विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने पुन्हा त्याच जोमाने काम करुन पुन्हा निवडणुकीत उभं राहणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube