Jagdish Mulik : ‘महाविकास आघाडीतील 19 नगरसेवक भाजपच्या वाटेवर’

Jagdish Mulik : ‘महाविकास आघाडीतील 19 नगरसेवक भाजपच्या वाटेवर’

पुणे : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) 19 नगरसेवक (Corporator)भाजपात (BJP)प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचा दावा भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik)यांनी केलाय. महाविकास आघाडीच्या हाती काही नाही, त्यामुळंच त्यांचे नगरसेवक भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचं मुळीक यांनी सांगितलंय. कसबा (Kasba)पोटनिवडणुकीच्या (By Election)पार्श्वभूमीवर भाजप कार्यालयात नियोजनासाठी बैठक झाली. त्यावेळी जगदीश मुळीक यांनी हा मोठा दावा केलाय.

मुळीक म्हणाले, विरोधकांनी टिळक कुटूंब नाराज असल्याच्या अफवा पसरवल्यात. कसबा पोटनिवडणूक नियोजनाची बैठकीत कुणाल आणि शैलेश टिळक (Shailesh Tilak)यांनी सहभाग घेऊन पक्षाला पाठिंबा दिलाय.

हेमंत रासने (Hemant Rasne) यांचा उमेदवारी भरताना शैलेश टिळक वैयक्तिक कारणामुळं आले नव्हते. भाजपला पराभवाची भीती नाही. एक वर्षासाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळं निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलंय.

विरोधकांनी पोटनिवडणुकीसाठी उमेदवार दिलाय. मात्र महाविकास आघाडीच्या हातात काही नाही, याची जाणीव महाविकास आघाडीतील नगरसेवकांना असल्याचंही यावेळी मुळीक यांनी सांगितलं.

नगरसेवकांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच गरज लागत आहे. त्यामुळं भाजपमध्ये प्रवेश करण्यास ते इच्छुक असल्याचं भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube