Devendra Fadanvis : ‘कसबा, चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध होणार’

Devendra Fadanvis : ‘कसबा, चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध होणार’

नवी दिल्ली : पुण्यातील कसबा (Kasba)आणि चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी मी स्वतः काही प्रमुख नेत्यांशी बोललो आहे, त्यांना विनंती केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)देखील सर्वच प्रमुख नेत्यांशी बोललेले आहेत. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule)यांनी देखील जवळपास सर्वच नेत्यांना विनंती केली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की हे नेते या विनंतीला मान देतील व चिंचवड आणि कसबा या पोटनिवडणुका बिनविरोध होतील अशी आशा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी नवी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विधानसभा निवडणुकींना वर्ष-दीड वर्ष बाकी असताना अशा पद्धतीनं निवडणुका न झालेल्या सर्वांसाठीच योग्य आहे. त्यामुळं आमच्या विनंतीला काय रिस्पॉन्स मिळतोय याची आपण वाट पाहूयात असंही ते म्हणाले.

अजित पवार यांनी दिलेल्या बाकी पोटनिवडणुकींच्या उदाहरणाबद्दल विचारलं असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार जेव्हाचे उदाहरण देत आहेत तेव्हा जनरल इलेक्शनला तीन ते चार वर्ष बाकी होते. अशा काळातील ते उदाहरणं आहेत. आता जनरल इलेक्शनला वर्ष-दीड वर्ष बाकी आहे. त्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी या गोष्टीचा विचार करावा, असंही ते म्हणाले.

फडणवीस म्हणाले, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक झाली तर आम्ही लढवणारच आहोत, त्यात काही प्रश्नच नाही. आम्ही फक्त एकाच निवडणुकीत निर्णय घेतला असं नाही तर विधान परिषदेला देखील दोन वेळेस त्यांच्या विनंतीचा मान देऊन आमचा उमेदवार मागे घेतला आहे. त्यामुळं त्यांनी देखील विचार केला पाहिजे, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube