खेडमध्ये भीषण अपघात, देवदर्शनाला जाताना गाडी दरीत पलटी, 3 महिलांचा जागीच मृत्यू

खेड : खेड : देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात Khed Accident ) तीन महिला ठार झाल्या आहेत. तर अन्य काही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. ही मोठी दुर्घटना खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कुंडेश्वर शिव मंदिराकडे (Kundeshwar Shiva Temple) जाताना घाट परिसरात घडली आहे.
हृता-ललितचा वाढदिवस ठरणार प्रेक्षकांसाठी पर्वणी, ‘आरपार’ चित्रपटातून पहिल्यांदाच गाजवणार मोठा पडदा
सविस्तर वृत्त असे की, पापळवाडी येथील काही महिला दर्शनासाठी कुंडेश्वर येथे देवदर्शनासाठी जात होत्या. महिलांची गाडी ही कुंडेश्वर डोंगराच्या पहिल्या वळणावर घाट चढत होती. गाडी पुढं न गेल्यानं पाठीमागे येऊन शंभर ते दीडशे फूट खोल दरीत गाडी पलटी झाली. या अपघातात गाडीमधील तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.
खंडणीखोरांचा सरदार कोण? जनता जाणते! बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका
तर अन्य 30 ते 35 महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना तातडीने पाईट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अधिक माहितीसाठी खेड पोलीस स्टेशनकडून तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
फडणवीस काय म्हणाले?
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत कुंडेश्वर येथे श्रावण सोमवारनिमित्त दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या पीकअप वाहनाला अपघात होऊन 7 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुख:द आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या कठीण प्रसंगात आमच्या सहवेदना त्यांच्यासोबत आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल. या अपघातात सुमारे 20 पेक्षा अधिक यात जखमी झाले असून, त्यांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या उपचाराची संपूर्ण व्यवस्था करण्यात येत असून, मी स्वत: पोलिस आयुक्तांशी संपर्कात आहे, असं फडणवीस म्हणाले.