Kirit Somaiya : अनिल परबांची मागणी चुकीची, ‘त्या’ महिलेला सुरक्षा द्या, ‘आप’च्या नेत्याची मागणी…

Kirit Somaiya : अनिल परबांची मागणी चुकीची, ‘त्या’ महिलेला सुरक्षा द्या, ‘आप’च्या नेत्याची मागणी…

Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह अवस्थेतला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विरोधी नेत्यांवर भ्रष्टाचाराचे ठेवणारे किरीट सोमय्यांना विरोधकांकडून चांगलाच हल्लाबोल चढवण्यात येत आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते अनिल परबांनी महिलेविषयीच्या माहितीची मागणी केली आहे. त्यानंतर आत या प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार यांनी उडी घेतली आहे. किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओ संदर्भात कुंभार ट्विट करीत अनिल परबांची मागणी चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशन सुरु असतानाच हा कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे विरोधकांनाही आता सोमय्यांचे धागेदोरे सापडल्याने त्यांना चांगलच धारेवर धरलं जात आहे. दरम्यान, अधिवेशनात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भातील एक पेनड्राईव्ह विधान परिषदेच्या सभापतींपकडे सादर केला आहे. तर विधानसभेत अनिल परबांनी व्हिडिओत दिसत असलेल्या महिलेची चौकशी करुन ही महिला कोण? याची माहिती महाराष्ट्राला कळली पाहिजे, अशी मागणी केली आहे. तर व्हिडिओत दिसत असलेल्या महिलेवर सोमय्यांनी अत्याचार केल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

किरीट सोमय्यांचा पाय आणखी खोलात? “लाव रे तो व्हिडीओ…” म्हणत पेनड्राईव्ह विधिमंडळात

विधानसभेत विरोधकांनी मागणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल आणि उच्च स्तरावर चौकशी करण्याची घोषणा केली. त्यावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही भाष्य केलं असून त्या म्हणाल्या, सोमय्यांच्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी जाहीर केली आहे. हा एक अस्वस्थ करणारा मुद्दा आहे. व्हिडिओ ब्लर करून चॅनेल्सवरून घराघरात हे शॉर्ट्स दाखवले जातात. आपल्या घरात लहान मुले असतात. ते पाहतात. मी विनंती करीन की तुम्ही व्हिडीओ ब्लर करत असला तरीही, व्हिडीओ दाखवत असताना थोडं बंधन ठेवा, असं आवाहन केलं आहे.

‘उद्धवजी, हीच ती वेळ! फक्त ‘टोमणे’ मारणार की उत्तरं देणार?’ बावनकुळेंनी साधलं बंगळुरूच्या बैठकीचं टायमिंग

या प्रकरणावरुन विरोधकांकडून टीका होत असल्याने अखेर किरीट सोमय्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सोमय्या म्हणाले, मी कोणत्याही महिलेचं शोषण केलेलं नाही. माझ्यावर आरोप केले जात आहेत. ज्या व्हिडिओ क्लिप्स व्हायरल केल्या जातायेत. त्याची सत्यता पडताळून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.

दरम्यान, राजकीय वर्तुळात व्हिडिओच्या प्रकरणावरुन वादंग पेटलेलं असतानाच आम आदमी पक्षाचे विजय कुंभार यांनी राज्य सरकारकडे महिलेच्या माहितीविषयी गोपनीयता बाळगून महिलेला संरक्षण द्या, अशी मागणी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube