मुंबई : सत्तासंघर्षाची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरु असतानाच आता शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ येत्या 23 जानेवारीला संपणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सलग दुसऱ्यांदा 2018 मध्ये निवड झाली होती. आता शिवसेना पक्षाचा नवा पक्षप्रमुख कोण असणार? याची उत्सुकता शिवसैनिकांसह सर्वांनाच लागलीय. यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार अनिल देसाई यांनी भूमिका स्पष्ट केलीय. आमच्या […]
नाशिक : महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे नेते जयप्रकाश छाजेड यांच्या निधनावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्याक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय. कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला, अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केला आहे. ते म्हणाले, छाजेड कॉंग्रेसचे निष्ठावान कार्येकर्ते होते. त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कॉंग्रेसची विचारधारा सोडली नाही. कामगारांच्या न्याय हक्कासाठी सतत झटणाऱ्या जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने एक सच्चा […]
सातारा : मुलाच्या प्रेमसंबंधामुळे जात पंचायतीकडून जवळपास 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचा प्रकार सातारा जिल्ह्यातील पुसेगाव इथं घडला आहे. कुटुंबाला दंड ठोठावण्यापासून ते सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी जातपंचायतीच्या एकूण 5 जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेमकं प्रकरण काय? साताऱ्यातील पुसेगावतील रहिवासी असलेल्या माधुरी धनु भोसले यांच्या मुलाचं एका महिलेशी प्रेमसंबंध होते. या प्रेमप्रकरणाबद्दल […]
आमरावती : मागील 20 दिवसांत महाराष्ट्रातील तीन आमदारांच्या कारला अपघात झाला आहे. आज अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा रस्ता क्रॉस करताना अपघात झाला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा आमदारांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. बच्चू कडू यांना एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने डोक्याला मार लागला आहे. यात ते जखमी झाले असून त्यांना […]
पुणे : कोथरुड येथील कुस्तीमहर्षी स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022-23 च्या उद्घाटन झाले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आयोजक आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती होती. कुस्तीपटू आपले संपूर्ण आयुष्य कुस्ती खेळासाठी समर्पित करतात. […]
अहमदनगर : महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकिका स्पर्धा म्हणून ओळख असलेली ‘अहमदनगर महाकरंडक २०२३’ ही एकांकिका स्पर्धा ११ ते १४ जानेवारी रोजी सकाळी १० ते रात्री ९ यावेळेत अहमदनगर येथील माऊली सभागृहात होत आहे. यंदाचं स्पर्धेचं हे दहावं वर्ष आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातील २७ संघ सहभागी झाले आहेत. अनुष्का मोशन पिक्चर्स अॅण्ड एंटरटेन्मेंट, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल […]