कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला, छाजेड यांच्या निधनावर पटोलेंची प्रतिक्रिया

कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला, छाजेड यांच्या निधनावर पटोलेंची प्रतिक्रिया

नाशिक : महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे नेते जयप्रकाश छाजेड यांच्या निधनावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्याक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय. कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला, अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केला आहे.

ते म्हणाले, छाजेड कॉंग्रेसचे निष्ठावान कार्येकर्ते होते. त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कॉंग्रेसची विचारधारा सोडली नाही. कामगारांच्या न्याय हक्कासाठी सतत झटणाऱ्या जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने एक सच्चा कॉंग्रेसचा पाईक आणि कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला आहे.

तसेच नाशिक शहराच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व कामगार क्षेत्रात जयप्रकाश छाजेड सक्रिय असायचे. पक्ष संघटनेसोबतच कामगारांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत व कामगारांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. छाजेड यांनी युवक काँग्रेसपासून आपली राजकीय कारकिर्द सुरु केली होती.

नाशिक शहर व राज्य पातळीवर त्यांनी पक्ष संघटनेत विविध पदांवर काम केले. विधान परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पक्षाने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी सार्थ ठरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने कामगारांच्या हितासाठी लढणारा एक आवाज आज काळाच्या पडद्याआड गेल्याचंही त्यांनी म्हंटलंय.

मंगळवारी रात्रीच्या सुमारास छाजेड यांना अचानक ह्रदयविकाराचा धक्का आल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

दरम्यान, जयप्रकाश छाजेड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी छाजेड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचंही नाना पटोले म्हंटले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube