पितृपक्षानंतर मोठा निर्णय, भाजपला धक्का बसणार? भाजप नेत्याचे पक्षांतराचे स्पष्ट संकेत..
Maharashtra Elections : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा (Maharashtra Elections) लवकरच होणार आहे. त्याआधी फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. तसेच नेतेमंडळींकडून सेफ पक्षाचा शोध घेतला जात आहे. तिकीट मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने दुसऱ्या पक्षांकडे चाचपणी सुरू झाली आहे. यात दिग्गज नेतेही मागे नाहीत. पुणे जिल्ह्यात (Pune News) या संभाव्य पक्षांतराची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीतील नेते महाविकास आघाडीत त्यातही शरद पवार गटात (Sharad Pawar) जाण्यात जास्त इच्छुक दिसत आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील लवकरच (Harshavardhan Patil) तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा राजकारणात आहे. या चर्चेला खुद्द हर्षवर्धन पाटील यांनीच दुजोरा दिला आहे. जनतेच्या मनात जे आहे तोच निर्णय येत्या विधानसभा निवडणुकीत होईल असे सूचक वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केले.
हर्षवर्धन पाटील देणार धक्का, अधिवेशनाला मारली दांडी, भाजपात चाललं तरी काय?
आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. महायुतीत अजित पवारांची एन्ट्री झाल्याने आपल्याला तिकीट मिळेल याची शाश्वती हर्षवर्धन पाटलांना नाही. कारण इंदापूर मतदारसंघात अजित पवार गटाचा आमदार आहे. त्यांच्याकडून ही जागा भाजपला दिली जाण्याची शक्यता आजिबात नाही. त्यामुळे तिकीट मिळण्याची शक्यता पाटील यांना वाटत नाही. अशा परिस्थितीत शरद पवार गटाचा पर्याय सर्वोत्तम आहे. त्यांनाही या मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार पाहिजेच आहे. हर्षवर्धन पाटील यांनी जर राष्ट्रवादीत प्रवेश केला तर त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.
त्यामुळेच जनतेच्या मनात जे आहे तोच निर्णय येत्या विधानसभा निवडणुकीत घेण्यात येईल. एवढा पितृ पंधरवडा जाऊ द्या मग मोठा निर्णय घेणार असे संकेत हर्षवर्धन पाटील यांनी दिले आहेत. पाटील यांनी आता तुतारी हाती घ्यावी अशी कार्यकर्त्यांचीही मागणी आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील या शक्यतांना अधिक बळ मिळालं आहे.
मराठा समाज हा सर्वांना सोबत घेणारा समाज; मनोज जरांगेंच्या भूमिकेला आमचा पाठिंबा -शरद पवार
सन 1995 ते 2009 या काळात हर्षवर्धन पाटील सलग चार वेळा इंदापूर मतदारसंघातून निवडून आले आहेत. नंतर 2014 आणि 2019 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत दत्ता मामा भरणे यांनी त्यांचा पराभव केला होता. आमदार दत्ता भरणे सध्या महायुतीतील अजित पवार गटात आहेत. त्यामुळे महायुतीने एकत्रित निवडणूक लढल्यास हर्षवर्धन पाटील यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे महायुतीत हर्षवर्धन पाटील यांची चांगलीच कोंडी झाली आहे.