हजारो कोटींच्या घोटाळा प्रकरणात सुनेत्रा पवारांना दिलासा; निवडणुकीआधीच मिळाली क्लीनचिट
Maharashtra News : राज्यात गाजलेल्या शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. अजित पवार यांच्याशी निगडीत कोणत्याही व्यवहारात फौजदारी गुन्हा होत नाही, असे या प्रकरणातील क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले आहे.आर्थिक गुन्हे शाखेने 25 हजार कोटींच्या कथित घोटाळा प्रकरणात सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार आहेत. या निवडणुकीआधीच या घोटाळ्यात सुनेत्रा पवारांना क्लीनचिट मिळाली आहे.
पार्थ पवार यांना थेट ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा! मात्र, सुरक्षा देण्याचं कारण काय?
आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणात सन 2020 मध्ये क्लोजर रिपोर्ट सादर केला होता.परंतु, याचवेळी अजित पवार आणि त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांच्या चौकशीच्या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने जानेवारी 2024 मध्ये पुन्हा एकदा क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. अजित पवार यांच्याविरोधात कोणताही पुरावा नाही, असे या अहवालात नमूद करण्यात आले होते.
शिखर बँकेने मागील 15 ते 20 वर्षांपूर्वी राज्यातीस 23 कारखान्यांना कर्ज दिलं होतं. परंतु, पुढे हे कारखाने तोट्यात गेल्याने कर्जाची वसुली होऊ शकली नाही. कर्ज बुडीत खात्यात गेली. पंरतु, कालांतराने हेच कारखाने राजकारणी नेत्यांनी खरेदी केले. यातील काही नेत्यांना पुन्हा त्याच कारखान्यांना शिखर बँकेने कर्ज दिल्याचा आरोप झाला होता. या सगळ्या प्रक्रियेत बँकेचे तब्बल 2 हजार 61 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
या प्रकरणात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात पहिला क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. नंतर राज्यात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपनं सरकार स्थापन केलं. तेव्हा या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करण्यात आला होता. आता मात्र या प्रकरणात अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवारांनाही क्लीनचिट मिळाली आहे.
अजित पवारांवर बोलावं इतकी आपली पात्रता नाही, उमेश पाटलांनी घेतला जानकरांचा समाचार