पुण्यात एक हजार ठिकाणी पंतप्रधानांची मन की बात; भाजपने केली जय्यत तयारी

पुण्यात एक हजार ठिकाणी पंतप्रधानांची मन की बात; भाजपने केली जय्यत तयारी

Mann Ki Baat in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात (Mann Ki Baat) या कार्यक्रमाचा 100 वा भाग येत्या रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी भाजपने केली आहे. मन की बातद्वारे मोदींचे संबोधन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी नियोजन केले जात आहे. पुणे शहरात तब्बल एक हजार ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रसारण करण्याची तयारी शहर भाजपने केली आहे, अशी माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी दिली.

नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पंतप्रधान झाल्यापासून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशवासियांना उद्देशून “मन की बात” कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमाचा पहिला भाग 3 ऑक्टोबर 2014 मध्ये प्रसारित करण्यात आला होता. त्यानंतर आता रविवारी शंभरावा भाग प्रसारित होणार आहे. नागरिक मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम ऐकत असतात.देशामध्ये घडणाऱ्या अनेक घटना तसेच विविध नागरिक अथवा विविध समूह यांनी केलेले विशेष कार्य या कार्यक्रमाद्वारे मोदी देशवासियांपर्यंत नेत असतात.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी वंदे भारत ट्रेनवर खासदाराचे पोस्टर चिकटवले, गुन्हा दाखल

येत्या रविवारी ३० तारखेला सकाळी ११ वाजता या उपक्रमाचा शंभरावा भाग प्रसारित होणार आहे. पुणे शहरात या शंभराव्या मन की बात कार्यक्रमाचे प्रसारण १००० ठिकाणी आयोजित करण्याचे पुणे शहर भाजपाने ठरवले आहे, असे मुळीक म्हणाले.

शहरातील प्रत्येक बुथवर या कार्यक्रमाचे जाहीर प्रसारण करण्यात येणार आहे. तसेच विविध सोसायटी, गणेश मंडळ व अनेक संस्था यांच्या माध्यमातून हा मन की बात कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे. पुणे शहरातील सर्व नागरिकांनी या शंभराव्या मन की बात कार्यक्रमाच्या प्रसारणात सहभागी व्हावे असे आवाहन मुळीक यांनी केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube