वसंत मोरे पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार? चर्चा तर तशाच होताहेत…

वसंत मोरे पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार? चर्चा तर तशाच होताहेत…

Vasant More Resignation : ‘मला माझ्याच पक्षात त्रास दिला जात होता. माझ्यावर संशय घेतला जात होता. पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण आणि पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित केले जात होते. हे सगळंच माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी होतं. मला तिकीट मिळू नये यासाठी पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न केले. आता परतीचे दोर मी स्वतः कापले’, हे शब्द आहेत मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे (Vasant More) यांचे. वसंत मोरे यांनी काल मध्यरात्री अस्वस्थ करणारी फेसबूक पोस्ट टाकली आणि आज “दुपारी साहेब मला माफ करा”, म्हणत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यानंतर आता वसंत मोरे यांची पुढील राजकीय वाटचाल काय असणार? निवडणुका जवळ आलेल्या असल्याने ते काय निर्णय घेणार? याची चर्चा सुरू झाली आहे.

Vasant More : नाव घेतलं की अख्खं शहर हलतंय; ठाकरेंच्या शिलेदारची सूचक पोस्ट

वसंत मोरे आता मनसेत नाहीत. पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देण्याआधी त्यांनी एक फेसबूक पोस्ट टाकली होती. एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. आता आपली कुणाकडून काहीही अपेक्षा नाही, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते. त्यानंतर आज दुपारी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिली. वसंत मोरे पुढे काय करणार, असे विचारले असता त्यांनी पुणेकर माझी पुढील वाटचाल ठरवतील, असे उत्तर दिलं. या उत्तरातून वसंत मोरे यांची पुढील राजकीय वाटचाल कशी राहिल याचं स्पष्ट उत्तर मिळत नाही. मात्र, पुण्यात तगड्या उमेदवाराच्या शोधात असलेल्या महाविकास आघाडीला उमेदवार मिळाला अशी चर्चा पुणेकरांच्या तोंडात आहे.

शरद पवारांच्या भेटीने चर्चांना उधाण 

या चर्चा होताहेत त्याला कारणही आहे. ते म्हणजे काही दिवसांपूर्वीच्या शरद पवार आणि वसंत मोरे यांच्या भेटीचं. पुण्यातील एका मैदानाच्या अतिक्रमणाच्या प्रश्नासंर्भात वसंत मोरे यांनी खासदार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. त्यावेळी या भेटीची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात झाली होती. ही भेट राजकीय नव्हती असे मोरे यांनी तेव्हाच सांगितले होते. परंतु, जो पॉलिटिकल मेसेज द्यायचा होता तो दिला गेलाच.

‘मविआ’चं गणित मोरेंच्या पथ्यावर 

पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र त्यांनी नुकतीच पोटनिवडणूक लढवली आहे. आता पुन्हा त्यांना लोकसभेचे तिकीट आणि त्यानंतर परत आमदारकी लढवायची झाल्यास त्यांना अवघड जाईल हे लक्षात घेता दुसऱ्या उमेदवाराची महाविकास आघाडीकडून चाचपणी होऊ शकते. वसंत मोरे यांची पुणे शहरात मोठी लोकप्रियता आहे. एक आक्रमक चेहरा म्हणून महाविकास आघाडीकडून त्यांना पुणे लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आताच्या घडीला आघाडीकडे दुसरा तगडा उमेदवार नाही. अशा परिस्थितीत वसंत मोरे यांचा विचार होऊ शकतो.

Amol Kolhe Meets Vasant More : अमोल कोल्हे वसंत मोरेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube