Ajit Pawar : पुण्याच्या विकासाला मोदींची साथ, अजितदादांकडूनही कौतुकाचा वर्षाव

Ajit Pawar : पुण्याच्या विकासाला मोदींची साथ, अजितदादांकडूनही कौतुकाचा वर्षाव

PM Modi Visit Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या विकासाचे नेतृत्व करतात. पुण्याच्या विकसासाठी सुद्धा मोदी नेहमीच सहकार्य करत असतात, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या कामकाजाचे कौतुक केले. पिंपरी चिंचवड येथील विविध कामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित होते.

‘मंत्रीपद नसल्याने हा माणूस बिथरला’; ठाकरे गटाचा नेता शिरसाटांवर भडकला

पवार पुढे म्हणाले, मोदी राज्याच्या विकासासाठी कायमच मदत करत असतात. त्याचा फायदा राज्यातील 14 कोटी लोकांना होतो. विकासकामे करत असताना अनेक अडचणी आल्या पण, पुण्यातील नागरिकांनी कोणतंही राजकारण मध्ये न आणता ही कामं पूर्ण करण्यासाठी मदत केली, असे स्पष्ट करत पवार यांनी पुणेकर जनतेचे आभार मानले. आता मी स्वतः मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्य विकासासाठी काम करत आहोत. राज्यातील ट्रिपल इंजिनचे सरकार जनतेच्या हितासाठी वेगाने काम करत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासामुळे देशाला चालना – मोदी

स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासामुळे भारताच्या औद्योगिक विकासाला सातत्याने चालना मिळाली आहे. भारतातील शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे राहणीमान सुधरायचे असेल, तर सार्वजनिक वाहतुकीचे आधुनिकीकरण करणे गरजेचे असल्याचे यावेळी मोदींनी सांगितले. 2014 पर्यंत 250 किमीपेक्षाही कमी मेट्रो नेटवर्क होतं. पण आता देशात हे नेटवर्क 800 किमीहूनही जास्त झालं आहे.

लोकसभेत उद्या INDIA ची अग्निपरीक्षा; केंद्र सरकार आणणार अध्यादेश

2014 मध्ये फक्त 5 शहरात मेट्रोची सेवा होती. पण आज देशात 20 शहरांमध्ये मेट्रोचे जाळे पसरले असून, महाराष्ट्रात पुण्याशिवाय मुंबई आणि नागपूरमध्येदेखील मेट्रोचा विस्तार होत आहे. पुण्यात प्रदुषण कमी करण्यासाठी मेट्रोचा विस्तार गरजेचा असल्याचेही यावेळी मोदींनी अधोरेखित केले. पुणे सारख्या शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनाचा दर्जा अधिक चांगला व्हावा यासाठी आमचे सरकार सतत काम करत आहे. महाराष्ट्राचा विकास झाला तर भारताचा विकास होईल. भारताचा विकास झाला तर महाराष्ट्राचा विकास होईल, असे पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube