सावधान! आज पुण्यासह ‘या’ 4 जिल्ह्यांत कोसळधार; हवामान खात्याचा रेड अलर्ट

FIR Against Ex MD Of BharatPe, Family For Allegedly Defrauding The Fintech Of ₹81 Crore (13)

Maharashtra Rain : राज्यात बऱ्याच दिवसांपासून गायब झालेला पाऊस कालपासून जोरदार बरसत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने आज राज्यातील चार जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.

Monsoon : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पंजाबराव डख यांनी पावसाविषयी दिली ‘ही’ माहिती…

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह ठाण्यातही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या व्यतिरिक्त राज्यातील रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला गेला आहे. मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

बंडानंतर पुढे अजितदादांची काय रणनीती? प्रकाश आंबेडकरांनी केलं भाकीत…

दरम्यान, पंजाबराव डख यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून राज्यभरात मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज व्यक्त केला होता. डख यांच्या अंदाजानुसार 18 जुलैपासूनच राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. 18 जुलैपासून ते 20 जुलैपर्यंत सर्वत्र मुसळधार पाऊस बरसणार असल्याचं डख यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच 23 जुलै ते 25 जुलैपर्यंत पुन्हा जोरदार पाऊस पडणार असून 28 जुलै 1 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम असणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कसलीही चिंता न करण्याचं आवाहन डख यांनी केलं आहे. एकूणच 30 जुलैपर्यंत राज्यात एक दिवसाआड पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज डख यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube