पुण्यात दंगल घडवून आणण्यासाठी गोऱ्हे, नार्वेकरांची चिथावणी; बोरवणकरांचा खळबळजनक दावा

  • Written By: Published:
Meera Borwankar allegation On Neelam Gorhe

Meera Borwankar allegation On Neelam Gorhe : काही दिवसांपूर्वी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ (Madam Commissioner) या पुस्तकातून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते. येरवडा भागातील पोलिसांच्या मोक्याचा जागेचा लिलाव प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी त्यांनी आपल्यालर दबाव आणला होता, असा गौप्यस्पोट त्यांनी केला. तर आता त्यांनी पुण्यात दंगल घडवून आणण्याचा कट होता. याला विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे(Neelam Gorhe, मिलिंद नार्वेकरांनी (Milind Narvekar) चिथावणी दिली होती, असा आरोप त्यांनी केला आहे.

‘मविआ’चं पाप आमच्या माथी नको, उबाठा सरकारचे कंत्राटी भरतीचे ‘जीआर’ रद्द; फडणवीसांची मोठी घोषणा 

सध्या बोरवणकक यांच्या पुस्तकामळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवारांवर आरोप केल्यानंतर त्यांनी आपल्या मॅडम कमिशनर याच पुस्तकातून मिलिंद नार्वेकर आणि नीलम गोऱ्हे यांची नाव घेत थेट आरोप केले. पुणे महापालिकेने लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवल्यानंतर मिलिंद नार्वेकर आणि नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहरातील काही भागात हिंसाचार घडवून आण्यासाठी चिथावणी दिली होती. या दोघांमधील दूरध्वनीवर झालेल्या संभाषणातून ही बाब समोर आली, असा आरोप बोरवणकर यांनी केला.

23 डिसेंबर 2010 रोजी पुणे महानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लाल महालातून हटवला. याविरोधात शिवसेनेने पुणे बंदची हाक दिली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांनी काही नेत्यांच्या दूरध्वनी पाळत ठेवण्याचा निर्णय घेतला. गोऱ्हे आणि नार्वेकर यांनी पुण्यातील काही भागात रस्ता रोक, बस आणि ट्रकची जाळपोळ, दगडफेक करण्याच्या सूचना करत हिंसाचार घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला, असं त्यांच्या संभाषणातून समोर आलं. गोऱ्हे आणि नार्वेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची सूचना मी पोलस अधिकाऱ्याना दिली होती. मात्र, ते फारसे उत्सुक दिसले नाहीत, असं बोरवणकर यांनी पुस्तकात म्हटलं.

दरम्यान, यावर आता मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलं. रिटायर्ड झाल्यावर काही नेत्यांना लक्ष करून बदनाम केलं जातं. रिटायर्ड झाल्यावर अशी पुस्तकं संस्कृती पुढं यायला नको. निवृत्त झाल्यावर असे आरोप कऱणं योग्य की अयोग्य हे जनता ठरवेल, असं सामंत म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube