पिंपरी-चिंचवडकरांसाठी गुडन्यूज ! नाशिक फाटा- खेड एलिव्हेटेड कॉरिडोरला मंजुरी!

  • Written By: Published:
पिंपरी-चिंचवडकरांसाठी गुडन्यूज ! नाशिक फाटा- खेड एलिव्हेटेड कॉरिडोरला मंजुरी!

Nashik Fata-Khed elevated corridor : पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या पुढाकाराने बहुप्रतिक्षित “8 लेन एलिव्हेटेड नाशिक फाटा- खेड कॉरिडोर”ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तब्बल 7 हजार 827 कोटी रुपये किमतीच्या 32 किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह चाकण औद्योगिक पट्ट्यातील प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडणारा दुवा निर्माण होणार आहे. (Nashik Fata-Khed elevated corridor approved!)

मुलाचा हट्ट पुरवायचे काम वडिलांचं, त्यांनी चिंता करू नये, त्यांचा भ्रम…; विखेंचं थोरातांना प्रत्युत्तर

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांनी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासाला नवा आयाम यानिमित्ताने मिळणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिक फाटा ते खेड अंतर अगदी काही मिनिटात पार करता येईल. तसेच, शहरातील तळवडे-चिखली-मोशी- भोसरी परिसरातील “ट्रॅफिक कोंडी” कायमची सुटणार आहे.

कोण आहे ही ‘माया’, जी सांभाळणार TATA ग्रुपची जबाबदारी?

पिंपरी- चिंचवड शहराच्या विकासाला चालना देणाऱ्या या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे तमाम पिंपरी चिंचवडकर यांच्या वतीने आमदार महेश लांडगे यांनी आभार मानले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube