मुलाचा हट्ट पुरवायचे काम वडिलांचं, त्यांनी चिंता करू नये, त्यांचा भ्रम…; विखेंचं थोरातांना प्रत्युत्तर
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भाजप नेते सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सुजय विखे यांची खिल्ली उडवली. ते मोठ्याचं लाडकं लेकरू, त्याचा छंदच असेल तर तो पुरवला पाहिजे, असा खोचक टोला थोरातांनी लगावला. त्यांच्या या टीकेला आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी (Radhakrishna Vikhe Patil) प्रत्युत्तर दिलं.
Manorama Khedkar : शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरांना जामीन!
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना थोरातांना केलेल्या टीकेविषयी विचारले असता मंत्री विखे म्हणाले की, मुलाचा हट्ट पुरवायचे काम वडिलांचे असते. मुलाचा किती छंद पुरवायचा, काय करायचं, याची त्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. आज ते भ्रमात आहेत, मात्र आम्ही त्यांचा भ्रम लवकरच दूर करू, असा इशारा मंत्री विखेंनी दिला.
BB Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘कोकण हार्टेड गर्ल’ आहे रडूबाई; काय आहे कारण?
ते म्हणाले, सुजय यांनी निवडणुक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या भावनांचा आदर करायचा असतो. शेवटी महायुतीत काय निर्णय होईल, त्याप्रमाणे तो निर्णय मान्य करायचा असतो, असंही विखे म्हणाले.
दूध दराविषयी विचारले असता ते म्हणाले, दूध दराविषयी सरकारने निर्णय घेतला आहे. सरकारने दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचं ठरवलं. तसेच सहकारी आणि खासगी दुध संघांनी दुधाला तीस रुपये भाव दिला पाहिजे. जे दूध संघ तीस रुपये भाव देणार नाहीत, त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करू, असा इशाराही विखेंनी दिला.
सुजय विखेंचं वक्तव्य काय?
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे मी शिर्डीतून निवडणूक लढवणार ही चर्चा निरर्थक आहे. माझ्याकडे आता वेळ आहे. शेजारी कुठं संधी मिळाल्यास माझा विधानसभा लढविण्याचा प्रयत्न असेल. श्रीरामपूर राखीव असल्याने माझ्यासमोर संगमनेर आणि राहुरी हेच पर्याय आहेत, असे सुजय विखे पाटील म्हणाले होते.
थोरातांची टीका काय?
संजय विखेंच्या वक्तव्यावरून थोरातांनी टीका केली होती. ते म्हणाले, हे मोठ्याचं लाडकं लेकरू आहे. त्याचा छंदच असेल तर तो पुरवला पाहिजे या मताचा मी आहे. पक्षाने नाही तर तो पालकाने पुरवला पाहिजे. ते दोन ठिकाणी म्हटले आहेत. त्यांचा छंद पुरवण्यासाठी ते दोन्ही ठिकाणी उभे राहू शकतात. यामुळे बालकाचा छंद तर पुरा होईल, असं म्हणत थोरातांनी फिरकी घेतली होती.