“आम्हाला बारामतीचा दादा बदलायचाय…” : युगेंद्र पवारांसाठी कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे फिल्डिंग

“आम्हाला बारामतीचा दादा बदलायचाय…” : युगेंद्र पवारांसाठी कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे फिल्डिंग

बारामती : आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, तुम्ही युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना ताकद द्या, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे युगेंद्र पवार यांना बारामतीमधून उमेदवारी देण्याची मागणी केली. निवडणुकांची धामधूम संपल्यानंतर, पक्षाचा वर्धापनदिन पार पडल्यानंतर शरद पवार हे आज (11 जून) बारामतीमधील गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. यावेळी बारामती आणि आजूबाजूच्या भागातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेण्यासाठी गर्दी केली होती. याचवेळ युवा नेते युगेंद्र पवार यांचे समर्थकही शरद पवार यांना भेटण्यासाठी आले होते. (NCP (Sharad Chandra Pawar) party workers demanded party president Sharad Pawar to nominate Yugendra Pawar from Baramati.)

यावेळी कार्यकर्ते म्हणाले, योगेंद्र पवार हे बारामतीत लक्ष घालत आहेत. लोकांच्या समस्या जाणून त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आम्हाला पाणी नव्हते तर त्यांनी पाण्याची सोय करुन दिली, नुकसान भरपाई दिली. त्यामुळे आता तरी युगेंद्र पवार यांच्याशिवाय दुसरा कोणताच उमेदवार योग्य नाही. तुम्ही युगेंद्र पवार यांना ताकद द्या, आम्ही सगळे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत. एक नवीन चेहरा तुम्ही बारामतीसाठी द्यावा, आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, अशी जाहीर आणि थेट मागणीच कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली.  यावर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांचं म्हणणे ऐकून घेतले. पण हातवारे करत ‘उमेदवारीची चर्चा करू नका’ असे सांगितले. तसेच, यावर काय तो निर्णय लवकरच होईल पण  तोपर्यंत संयम राखण्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

NEET-UG परीक्षार्थींना मोठा धक्का : परीक्षा रद्द करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

कोण आहेत युगेंद्र पवार?

श्रीनिवास पवार आणि अजित पवार हे दोघेही सख्खे बंधू. तर विजया पाटील या त्यांच्या सख्ख्या भगिनी आहेत. अजित पवार यांना जय आणि पार्थ ही दोन मुले तर श्रीनिवास यांना युगेंद्र हा मुलगा. थोडक्यात अजित पवार यांच्या सख्ख्या भावाच्या मुलगा म्हणजे युगेंद्र पवार. म्हणजेच अजित पवार यांचा सख्खा पुतण्या हाच आता त्यांच्या विरोधात उभा राहिला आहे. युगेंद्र हे अत्यंत शांत, संयमी आणि मितभाषी म्हणून ओळखले जातात. ते आधी मुंबईत होते. नंतर पुण्यात आले. त्यानंतर अमेरिका आणि युरोपात गेले. जवळपास सात ते आठ वर्षे देशाबाहेरच होते. परत आल्यानंतर सुरुवातीला मुंबईत व्यवसाय पहायला लागले. त्यानंतर चार वर्षांपूर्वी विद्या प्रतिष्ठान येथे त्यांची निवड झाली. चार वर्षांपासून ते बारामतीमध्ये सक्रिय झाले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज