डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थी व प्राध्यापकांचा ‘निर्मल वारी सेवा २०२६’ उपक्रमात सहभाग

या सेवाकार्यात सहभागी विद्यार्थ्यांनी सेवाभाव, शिस्त, सामाजिक उत्तरदायित्व, टीमवर्क आणि नेतृत्वगुण यांचे उत्कृष्ट दर्शन घडविले.

News Photo   2026 07 13T141336.043

आषाढी वारीच्या निमित्त डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन अँड मॅनेजमेंट (DYPIMCAM), आकुर्डी येथील विद्यार्थी व प्राध्यापकांनी निर्मल वारी सेवा २०२६’ या सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

इग्नायटेड युथ फोरम (IYF) यांच्या सहकार्याने तसेच डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल, आकुर्डी यांच्या समाजसेवेच्या समृद्ध परंपरेला अनुसरून हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग घेतला. स्वयंसेवकांनी वारकऱ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छता (Hygiene) व परिसर स्वच्छतेबाबत जनजागृती, स्वच्छतेचा संदेश प्रसारित करणे, वारी व्यवस्थापनात सहकार्य करणे तसेच वारकऱ्यांना आवश्यक ती मदत पुरवून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला.

वारी आणि माझं नात अजून घट्ट झाल, पहिल्यांदा अल्बम साँग आणि ते सुद्धा विठ्ठलाच  रिंकू राजगुरू !

या सेवाकार्यात सहभागी विद्यार्थ्यांनी सेवाभाव, शिस्त, सामाजिक उत्तरदायित्व, टीमवर्क आणि नेतृत्वगुण यांचे उत्कृष्ट दर्शन घडविले. या उपक्रमातून स्वच्छता, आरोग्य, सामाजिक जाणीव आणि मानवतेचा संदेश मोठ्या संख्येने उपस्थित वारकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.

महाविद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थी स्वयंसेवक व प्राध्यापकांचे अभिनंदन करण्यात आले. समाजसेवा, स्वच्छता आणि सामाजिक उत्तरदायित्वाची मूल्ये जपणारा हा उपक्रम वारकरी तसेच नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला.

follow us