PDCC Bank Election : भरणे, थोपटे, वळसे पाटलांसह सात आजी-माजी आमदारांचे वर्चस्व पणाला
PDCC Bank Election: गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ बँकेच्या संचालक मंडळावर आपले स्थान कायम ठेवणाऱ्या प्रस्थापितांनी पुन्हा एकदा बँकेवर पकड घट्ट करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय.
PDCC Bank Election : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची (PDCC Bank Election) रणधुमाळी सुरू झालीय. या बँकेवर तीस वर्षांहून अधिक काळ राष्ट्रवादीचे (NCP) वर्चस्व राहिलेले आहे. स्वर्गीय अजित पवार यांच्यात ताब्यात ही बँक राहिलेली आहे. अजित पवार यांच्यानंतर ही बँक ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना संघर्ष करावा लागणार आहे. हा संघर्ष महायुतीतील पक्ष भाजपबरोबर करावा लागणार आहे. त्याबरोबर बँकेत तब्बल सात आजी-माजी आमदार आणि मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार ाहे.
गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ बँकेच्या संचालक मंडळावर आपले स्थान कायम ठेवणाऱ्या प्रस्थापितांनी पुन्हा एकदा बँकेवर पकड घट्ट करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील, भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे, खेडचे माजी दिलीप मोहिते, रेवणनाथ दारवटकर, आप्पासाहेब जगदाळे आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी बँकेत आपले स्थान तीन दशकांहून अधिक काळ कायम ठेवले आहे. पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्या घराण्यातही बँकेचे संचालकपद राहिलेले आहे. माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसमध्ये होते. दोघेही आता भाजपमध्ये आहेत. इंदापूरमध्ये दत्ता भरणे यांचे अनेक सेवा सोयायट्यांवर वर्चस्व आहेत. त्यामुळे भरणे किंवा त्यांचा मुलगा हे जिल्हा बँकेत जातील. येथूनच अप्पासाहेब जगदाळे हेही संचालक होतात. दोन्ही जागा राष्ट्रवादीला बिनविरोध करायच्या आहेत. ते इंदापूरमध्ये तसेच राजकीय समीकरणे आहेत. कारण माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपतीनिमित्त मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हजेरी लावलेली आहे. पंचायत समिती आणि झेडपीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्या आहे. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीत एकत्रित दिसतील.
Video : पुणे पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात का उतरल्या?, हर्षदा देशमुख जाधव यांनी सांगितलं नेमकं कारण
सेवा सोसायटी मतदारसंघातून प्रतिनिधी पाठविण्यासाठी ठराव घेण्यात येत आहे. 22 सप्टेंबरपर्यंत हे ठराव घेतले जात आहे. त्यामुळे येत्या नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीच्या रणधुमाळीत ही निवडणूक लागू शकते. या बँकेत संचालकांच्या 21 जागा आहेत. त्यात 9 हजार 216 मतदार आहेत. तर 7517 संस्था सभासद आहे. तर 1699 व्यक्ती सभासद आहेत. अ वर्गातील सेवा सोयाटीतून 13 जागा, ब, क व ड वर्गातून प्रत्येकी एक अशा तीन संचालक निवडून दिले जाणार आहेत. तर पाच जागा विविध राखीव प्रतिनिधी म्हणून निवडले जाणार आहेत. काही ठिकाणी जागा बिनविरोध होऊ शकतात. परंतु पुरंदर, भोर, जुन्नर, खेड तालुक्यात मात्र वेगळे राजकीय गणिते आहेत. त्यामुळे तेथे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात.
बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या रॅकेटचा पर्दाफाश; अहिल्यानगर पोलिसांची कारवाई
आर्थिक नाडी ताब्यात घेण्यासाठी संघर्ष ?
या बँकेवर अजित पवार गटाचे एकहाती वर्चस्व राहिलेले आहे. पुणे जिल्ह्यात सहकारी साखर कारखाने आहेत. त्या कारखान्यासाठी ही बँक महत्त्वाची असते. सुमारे 31 हजार कोटींहून अधिक उलाढाल असणारी ही बँक शेतकऱ्यांसाठी जिल्ह्याची आर्थिक नाडी आहेत. त्यावर वर्चस्व मिळविण्यासाठी भाजप आगामी काळात कोणती व्यूहरचना आखणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. त्यात पुणे जिल्ह्यावर वर्चस्व राखण्यासाठी राष्ट्रवादीसाठी ही बँक महत्त्वाची आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.